ETV Bharat / sports

IPL मधून बाहेर पडलेल्या LSG विरुद्ध GT मैदानात, नवी जर्सी घालून खेळणार गुजरात संघ; हवामान अंदाज काय? - GT VS LSG MATCH PREVIEW

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 64व्या सामन्यात, आज गुजरात टायटन्स (GT) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) हे संघ एकमेकांसमोर येतील.

GT vs LSG Match
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (ETV Bharat Graphics)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : May 22, 2025 at 11:08 AM IST

2 Min Read

अहमदाबाद GT vs LSG Match : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 64व्या सामन्यात, आज गुजरात टायटन्स (GT) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) हे संघ एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. गुजरात संघानं आधीच आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्याच वेळी, लखनऊ संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र गुजरात टायटन्स आजचा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये राहण्याचा इराद्यानं मैदानात उतरेल.

लखनऊ संघ आयपीएलमधून बाहेर : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली वेगवान गोलंदाजांना झालेल्या दुखापतींमुळं लखनऊ सुपर जायंट्स संघाची आयपीएल 2025 मध्ये कामगिरी खराब राहिली. 12 पैकी फक्त 5 सामने जिंकत 10 गुण मिळवणाऱ्या एलएसजीला टॉप-4 मध्ये स्थान मिळण्यास मुकावं लागलं आहे. आज गुजरातविरुद्धच्या सामन्यात लखनऊ संघ विजय नोंदवून आपल्या चाहत्यांना आनंदी होण्याची संधी देण्याचा प्रयत्न करेल. लखनऊकडे गमावण्यासारखं काहीही नाही, त्यामुळं सर्व खेळाडू कोणत्याही दबावाशिवाय त्यांचा नैसर्गिक खेळ खेळू शकतात.

गुजरातचा अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न : त्याच वेळी, गुजरात टायटन्स संघ आज त्यांच्या घरच्या मैदानावर सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये राहू इच्छितो. पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात. स्टार फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघानं आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. जीटी सध्या 12 सामन्यांत 18 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.

दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड : जर आपण गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोललो तर गुजरातचा हात वरचढ आहे. दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 6 आमनेसामने आले आहेत. यात गुजरातनं 4 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, लखनऊ संघानं 2 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. तर दोन्ही संघांमध्ये अलीकडेच खेळले गेलेले शेवटचे 2 सामने लखनऊनं जिंकले आहेत, त्यामुळं लखनऊला हलक्यात घेणं गुजरातला महागात पडू शकते.

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल : नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर ती फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. या मैदानावर बहुतेकदा उच्च धावसंख्या असलेले सामने पाहिले जातात, जिथं फलंदाज सेट झाल्यावर सहजपणे मोठे फटके मारु शकतात. या मैदानावर लाल माती आणि काळ्या मातीच्या खेळपट्ट्या अशा दोन प्रकारच्या खेळपट्ट्या उपलब्ध आहेत. लाल मातीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. त्याच वेळी, काळ्या मातीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करते कारण ती त्यांना उसळी देते. बहुतेक वेळा कर्णधार इथं नाणेफेक जिंकतो आणि प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतो.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

इम्पॅक्ट प्लेअर : साई सुदर्शन

लखनऊ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/ यष्टिरक्षक), आयुष बडोनी, अब्दुल समद, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई, मणिमारन सिद्धार्थ, विल्यम ओ'रुर्के

इम्पॅक्ट प्लेअर : शार्दुल ठाकूर

हेही वाचा :

  1. पाकिस्तानात जाण्यापूर्वी शेजाऱ्यांची नाचक्की; 'असोसिएट देशा'नं केला मालिकेत लाजिरवाणा पराभव
  2. 5 नव्हे तर चारच दिवसांची Test Match...! 22 वर्षांनी होणारा ऐतिहासिक कसोटी सामना 'इथं' पाहा लाईव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.