अहमदाबाद Purple Cap Winner IPL 2025 : आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स चा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली आहे. यासह त्याला 10 लाख रुपये रोख रक्कमही मिळाली आहे.
प्रसिध कृष्णाची दमदार कामगिरी : गुजरात टायटन्स कडून खेळणाऱ्या या वेगवान गोलंदाजांना संपूर्ण हंगामात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना धावा काढण्यास संघर्ष करायला लावला. त्यानं 14 साखळी सामने आणि एलिमिनेटर सामन्यासह हंगामात एकूण 15 सामने खेळले या 15 सामन्यांमध्ये त्यानं 59 शतक गोलंदाजी केली. यात 19.52 च्या सरासरी ना त्यानं 25 विकेट घेतल्या.

पाकिस्तानी गोलंदाजानंही जिंकली पर्पल कॅप : आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरनं पर्पल कॅप जिंकली होती. राजस्थान रॉयल्सच्या या गोलंदाजानं त्या हंगामात 11 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या हंगामाचं विजेतेपदही राजस्थान रॉयल्सला मिळालं होतं. मात्र आयपीएलच्या पहिल्याच हंगामात पाकिस्तानी खेळाडू दिसले. त्यानंतर त्यांना कधीच आयपीएल खेळायची संधी मिळाली नाही.

10 वेळा भारतीय गोलंदाजानं जिंकला सन्मान : आयपीएलच्या आतापर्यंतच्या 18 हंगामात 10 हंगामात पर्पल कॅप भारतीय गोलंदाजांनी जिंकल्या आहेत, ज्यामध्ये हर्षल पटेल आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी दोनवेळा ही कामगिरी केली आहे. तर उर्वरित 8 वेळा परदेशी गोलंदाजांना ही कॅप मिळाली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतीय खेळपट्ट्यांवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत फक्त तीन फिरकीपटू युजवेंद्र चहल, इम्रान ताहिर आणि प्रज्ञान ओझा यांनी पर्पल कॅप जिंकली आहे.
हेही वाचा :