अहमदाबाद Orange Cap Winners List : आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दरवर्षी ऑरेंज कॅप दिली जाते. हा स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक सन्मानांपैकी एक मानला जातो. यंदाच्या हंगामात गुजरातचा अव्वल फलंदाज साई सुदर्शनला हा सन्मान मिळाला आहे. तर सर्वप्रथम पहिल्या हंगामात पंजाब किंग्ज (पुर्वीचं किंग्ज इलेव्हन पंजाब) कडून खेळताना, शॉन मार्शनं 2008 मध्ये 11 सामन्यांमध्ये 616 धावा करुन ऑरेंज कॅप जिंकली होती.
𝘼 𝙎𝙘𝙞𝙣𝙩𝙞𝙡𝙡𝙖𝙩𝙞𝙣𝙜 𝙨𝙝𝙤𝙬 🔥
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
7️⃣5️⃣9️⃣ Runs
5️⃣4️⃣.2️⃣1️⃣ Average
6️⃣ Fifties
1️⃣ Hundred
For his tremendous consistency, Sai Sudharsan is crowned with the coveted Orange Cap 🥇#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @gujarat_titans pic.twitter.com/hJEiRdRazF
सुदर्शनच्या 700 हून अधिक धावा : गुजरात टायटन्सचा सलामीचा फलंदाज साई सुदर्शननं या हंगामात 14 साखळी सामने आणि एक एलिमिनेटर सामन्यासह एकूण 15 सामने खेळले. यात या 23 वर्षीय युवा फलंदाजानं 54.21 च्या भक्कम सरासरीनं 759 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 6 अर्धशतक आणि 1 शतकही झळकावलं आहे. त्यानं या हंगामात 156.17 च्या आक्रमक स्ट्राईक रेटनं या धावा केल्या आहेत. त्याखालोखाल मुंबईच्या सूर्यकुमार यादवनंही 16 सामन्यात 717 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या साई सुदर्शनला 10 लाख रुपये रोख रक्कमही मिळाली आहे.

सचिनही जिंकला सन्मान : वास्तविक 2008 च्या आयपीएलपूर्वी शॉन मार्श क्रिकेट जगतात अज्ञात होता, परंतु स्पर्धेत त्याच्या प्रभावी कामगिरीमुळं तो आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियासाठी नियमितपणे खेळू शकला. यानंतर, महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरनंही ऑरेंज कॅप जिंकली, त्यानं 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 15 सामन्यांमध्ये 618 धावा केल्या होत्या.

गेलच्या नावावर खास विक्रम : वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हा या पुरस्काराचा दावा करणारा पुढचा खेळाडू होता. त्यानं 2011 आणि 2012 मध्ये सलग ऑरेंज कॅप जिंकली, यासह असं करणारा तो पहिला खेळाडू ठरला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना, गेलनं 2011 च्या आयपीएलमध्ये 608 धावा केल्या आणि त्यानंतर 2012 च्या आयपीएलमध्ये 15 सामन्यांमध्ये 733 धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नरनं 3 वेळा जिंकली कॅप : मात्र ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक वेळा आयपीएल ऑरेंज कॅप जिंकली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या माजी कर्णधारानं 2015 ते 2019 दरम्यान तीनदा ऑरेंज कॅप जिंकली. 2016 मध्ये, जेव्हा वॉर्नरनं एसआरएचला आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं, तेव्हा विराट कोहलीचं वादळ दिसून आलं.
विराट कोहलीचा विक्रम : माजी आरसीबी कर्णधारानं 16 सामन्यांमध्ये 973 धावा केल्या. आयपीएलच्या एका हंगामात या सर्वाधिक धावा आहेत. तसंच कोहलीनं 2024 मध्ये 15 सामन्यांमध्ये 741 धावा करुन हा मान परत मिळवला. या यादीत जॉस बटलर, ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांची नावंही जोडली गेली आहेत.
हेही वाचा :