बेंगळूरु RCB vs DC : येथील एम चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या आयपीएलच्या 24व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा घरच्या मैदानावर सहा विकेटनं पराभव केला आहे. बेंगळूरुनं दिलेल्या 169 धावांचं लक्ष दिल्लीनं 4 गाड्यांच्या मोबदल्यात गाठत आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे दिल्लीनं या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले आहे आणि चारही सामन्यात विजय मिळवला आहे.
Vizag ✅
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 10, 2025
Chennai ✅
Bengaluru ✅
Chalo ghar chalein 💙❤️ pic.twitter.com/nhGhsimWpn
राहुलची मॅच विनिंग खेळी : आरसीबी ने दिलेल्या 169 धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली सुरुवातीच्या सहा षटकांमध्येच त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. बेंगळुरुकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत दोन विकेट घेतल्या. मात्र यानंतर के एल राहुल (93) आणि ट्रिटन्स स्ट्रब्स (38) यांनी 111 धावांची संयमी आणि अभेद्य भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढत विजय मिळवून दिला.
Caption in the image 🔥 pic.twitter.com/uvqZOneLO2
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 10, 2025
बेंगळूरुची प्रथम फलंदाजी : तत्पूर्वी या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षय पटेलनं नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. यानंतर फलंदाजी करायला आलेल्या बंगळूरुनं वादळी सुरुवात करत अवघ्या तीन षटकात 50 धावा केल्या होत्या. मात्र, चौथ्या शतकात सलामीवीर विराट कोहली आणि फिल्म सॉल्ट यांच्यातील ताळमेळ चुकल्यानं फिल्म सॉल्ट धावबाद झाला आणि यानंतर बेंगळूरुच्या फलंदाजीला उतरती कळा लागली. इथून पुढं बेंगळूरूचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. शेवटच्या दोन षटकांमध्ये टीम डेविड यानं काही आक्रमक फटके मारल्यानं बेंगळुरुला 20 षटकांत 7 बाद 163 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. बेंगळुरूकडून फिल्म सॉल्ट आणि टीम डेव्हिड यांनी सर्वाधिक प्रत्येकी 37 धावा केल्या. तर कर्णधार रजत पाटीदारनं 25 तर विराट कोहलीनं 22 धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आलं. तर दिल्लीकडून अष्टपैलू विप्रज निगम आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
𝐆𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 ✨ pic.twitter.com/u7Q2eGmd62
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 10, 2025
विराट कोहलीचा विक्रम : या सामन्यात आरसीबीचा अव्वल फलंदाज विराट कोहलीनं आपल्या नावावर आणखी एक विक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासात 1000 हून अधिक बाउंड्री मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्यानं आतापर्यंतच्या आयपीएल करिअरमध्ये 721 चौकार आणि 280 षटकार मारले आहेत.
IPL 2025 POINTS TABLE. 📈
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2025
- DC remains the only undefeated team! pic.twitter.com/TXH7sq7tVo
हेही वाचा :