ETV Bharat / sports

प्रोटीजविरुद्ध भारतीय संघ दुसरा विजय मिळवत मालिकेत निर्णायक आघाडी घेणार? महत्त्वाचा सामना 'इथं' पाहा लाईव्ह - INDW VS SAW 2ND ODI LIVE

वनडे तिरंगी मालिकेचा दुसरा सामना 29 एप्रिल (सोमवार) रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात खेळवला जाईल.

INDW vs SAW 2nd ODI Live
भारतीय संघ (BCCI Women X Account)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 29, 2025 at 12:43 AM IST

2 Min Read

कोलंबो INDW vs SAW 2nd ODI Live Streaming : दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात वनडे तिरंगी मालिकेचा दुसरा सामना 29 एप्रिल (सोमवार) रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध नऊ विकेट्सनं शानदार विजय मिळवल्यानंतर, भारत महिला क्रिकेट संघ आता मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा सामना करणार आहे.

पहिल्या सामन्यात भारताची घातक गोलंदाजी : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघानं शानदार कामगिरी केली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य ठरला. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला फक्त 147 धावांत गुंडाळलं. स्नेह राणानं तीन विकेट्स घेतल्या, तर नल्लापुरेड्डी चरणी, दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि अरुंधती रेड्डीनंही एक विकेट घेतली.

भारताची दमदार फलंदाजी : जर आपण भारतीय फलंदाजांबद्दल बोललो तर त्यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. स्टार सलामीवीर स्मृती मानधनानं 43 धावांची खेळी केली, तर सलामीवीर प्रतीका रावलनं अर्धशतक झळकावलं आणि नाबाद 50 धावा काढल्या. हरलीन देओलनंही 48 धावांची खेळी केली आणि भारतीय महिला संघानं 29.4 षटकांत 1 बाद 149 धावा करुन श्रीलंकेचा पराभव केला. भारताच्या या शानदार विजयामुळं त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे आणि आता ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी सज्ज आहेत.

खेळपट्टी कशी असेल : आर प्रेमदासा स्टेडियमवर फलंदाजांना संघर्ष करताना दिसू शकते. तर फिरकीपटू वर्चस्व गाजवतील अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी जेव्हा भारतानं श्रीलंकेचा दौरा केला होता. तेव्हा या मैदानावर तिन्ही वनडे सामने झाले होते आणि सर्व सामन्यांमध्ये फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना काही मदत करु शकतो आणि फलंदाजांनाही नवीन चेंडूनं धावा काढायच्या असतील. कारण खेळ जसजसा पुढं जाईल तसतसे फिरकीपटूची भूमिका महत्त्वाची होईल.

हेड टू हेड रेकॉर्ड कसा : भारत महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात आतापर्यंत 31 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय संघानं 18 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेनं 12 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. अशा परिस्थितीत, भारतीय संघ हा विक्रम आणखी सुधारण्याचा प्रयत्न करेल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील दुसरा वनडे वनडे सामना 29 एप्रिल 2025 रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:00 वाजता सुरु होईल. ज्याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील दुसरा वनडे सामना कुठं आणि कसा पहायचा?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील दुसरा वनडे सामन्याचं थेट प्रक्षेपण भारतात उपलब्ध होणार नाही, परंतु या सामन्याचं थेट प्रक्षेपण फॅनकोड मोबाइल अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

भारत : स्मृती मानधना, प्रीतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, काशवी गौतम, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी

दक्षिण आफ्रिका : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, लारा गुडॉल, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, सुने लुस, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), अँनेरी डेरक्सेन, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, नोनकुलुलेको म्लाबा

हेही वाचा :

  1. ₹12 कोटींमध्ये विकत घेतलेल्या खेळाडूनं खेळली नाही एकही मॅच, कारण काय?
  2. 3269 दिवसांनंतर पांड्याची अर्धशतकी खेळी, RCB चा गुणतालिकेत धमाका; गुजरातला न खेळताच धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.