ETV Bharat / sports

भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना 'इथं' पाहता येणार 'फ्री'मध्ये लाईव्ह... वाचा सर्व अपडेट - IND vs BAN 1st Test Live Streaming

IND vs BAN 1st Test Live Streaming Free : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या मालिकेत एकूण दोन सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे.

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 19, 2024, 12:03 AM IST

IND vs BAN 1st Test Live
IND vs BAN 1st Test Live (Getty Images)

चेन्नई IND vs BAN 1st Test Live Streaming Free : बांगलादेशचा क्रिकेट संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी भारतात दाखल झाला. सध्या भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ पहिल्या कसोटीच्या सरावात व्यस्त आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि नजमुल हुसेन शांतो कोणत्याही किंमतीला ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील.

भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये : पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर बांगलादेशचा संघ भारतात येत आहे. अशा स्थितीत संघाचं मनोबल उंचावलेलं आहे. दुसरीकडे, भारतीय संघ बांगलादेशकडून आतापर्यंत कसोटीत पराभूत झालेला नाही. अशा परिस्थितीत दोन्ही संघांनी एकमेकांपासून सावध राहण्याची गरज आहे. मालिकेची सुरुवात आजपासून पहिल्या कसोटीनं होणार आहे.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना कधी होणार?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवार 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठं होणार आहे?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचं थेट प्रक्षेपण कसं पहावं?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर केलं जाईल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचं लाइव्ह स्ट्रीमिंग कुठं पहावं?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर केलं जाईल. याशिवाय, तुम्हाला ईटीव्ही भारतवर पहिल्या कसोटीशी संबंधित अपडेट्स क्षणोक्षणी मिळतील.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मेहदी हसन मिराज, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), लिटन दास (यष्टीरक्षक), तैजुल इस्लाम, नईम हसन, हसन महमूद, तस्किन अहमद, नाहिद राणा, सय्यद खालिद अहमद, जेकार अली अनिक.

हेही वाचा :

  1. T20 ला अलविदा करणाऱ्या रोहित शर्माचं मोठं विधान; म्हणाला, 'आजकाल निवृत्ती हा एक...' - Rohit Sharma Big Statement
  2. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 'अशी' असेल भारतीय संघाची प्लेइंग 11; 'हा' दिग्गज 629 दिवसांनी करणार कसोटीत पुनरागमन - India Playing 11 For 1st Test

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.