चंदिगड Yuzvendra Chahal : आयपीएलमध्ये पंजाब किंग्जनं इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये कधीही असं घडलं नाही की एखाद्या संघानं 111 धावांच्या छोट्या धावसंख्येचाही बचाव केला असेल. आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. जिथं 250 हून अधिक धावा करणं देखील सुरक्षित नसतं, तिथं 111 धावा वाचवणं कौतुकास्पद असते. दरम्यान, हरलेल्या सामन्याला विजयात बदलण्याची क्षमता असलेला खेळाडू म्हणजे युजवेंद्र चहल, ज्यानं सामन्यात आपलं सर्वस्व पणाला लावलं. एकाच षटकात सलग दोन चेंडूंवर दोन विकेट घेऊन चहलनं सामना पूर्णपणे पंजाबच्या बाजूनं वळवला. एका क्षणी, तो हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर होता पण तो हुकला.
Relive the epic performance here 🎥🔽 | #TATAIPL | #PBKSvKKRhttps://t.co/nP1jyDyKsA https://t.co/VPoqF82Qzr
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
युजवेंद्र चहलच्या चार षटकांत चार विकेट्स : युजवेंद्र चहलनं चार षटकांत फक्त 28 धावा देत चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याच्या एका षटकात आंद्रे रसेलनं दोन षटकार आणि एक चौकार मारला. मग असं वाटत होतं की सामना केकेआरच्या बाजूनं जाईल, पण तसं झालं नाही. डावाच्या 12व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चहलनं प्रथम रिंकू सिंगला बाद केलं. त्यानं 9 चेंडूत 2 धावा काढल्या होत्या आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर रमणदीप सिंग शून्यावर बाद झाला. दोघंही आक्रमक फलंदाज आहेत जे केकेआरसाठी सामना जिंकू शकले असते, परंतु दोघंही लागोपाठ बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानं सामना पंजाबच्या बाजूनं गेला.
From the ecstasy of chasing big 🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
To the ecstasy of defending low 🛡️
The battle between these 2️⃣ teams is a rollercoaster you don’t want to miss 🎢#TATAIPL | #PBKSvKKR | @PunjabKingsIPL pic.twitter.com/RPC7Kx5Aa6
चहलनं आठव्यांदा आयपीएल सामन्यात घेतल्या चार विकेट्स : युजवेंद्र चहलनं एका डावात चार विकेट्स घेण्याची ही आठवी वेळ आहे. आता या बाबतीत तो सुनील नारायणच्या बरोबरीला पोहोचला आहे. सुनीलनं आयपीएलमध्ये आतापर्यंत आठ वेळा चार विकेट्स घेतल्या आहेत. चहलनं सात वेळा हा पराक्रम करणाऱ्या लसिथ मलिंगाला मागं टाकलं आहे. या आठपैकी चहलनं केकेआरविरुद्ध तीनदा एका डावात चार विकेट्स घेतल्या आहेत. चहलनं आतापर्यंत आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध 33 विकेट्स घेतल्या आहेत. तर पंजाबविरुद्धही 32 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यासाठी तो या वर्षी खेळत आहे.
Runs were low. But belief? Sky high 🫡#PBKS script history with the boldest defence ever in #TATAIPL! 💪#PBKSvKKR | @PunjabKingsIPL pic.twitter.com/whS0oXuK23
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
चहल ठरला सामनावीर : हरलेल्या सामन्यात पुनरागमन करुन आपल्या संघाला विजयाकडे नेणाऱ्या युजवेंद्र चहलची या सामन्यासाठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. त्याच्या अद्भुत कामगिरीमुळं, पंजाब किंग्जनं पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यापूर्वी पंजाब संघ सहाव्या स्थानावर होता, परंतु या विजयानंतर पंजाब संघानं आठ गुण मिळवून चौथं स्थान मिळवलं आहे. आता चहल संघाचा नवा सामनाविजेता आहे, त्याला आगामी सामन्यांमध्येही लक्षात ठेवलं जाईल.
𝙏𝙃𝙄𝙎. 𝙄𝙎. 𝘾𝙄𝙉𝙀𝙈𝘼 🎬#PBKS have pulled off one of the greatest thrillers in #TATAIPL history 😮
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
Scorecard ▶️ https://t.co/sZtJIQpcbx#PBKSvKKR | @PunjabKingsIPL pic.twitter.com/vYY6rX8TdG
हेही वाचा :