अहमदाबाद GT vs PBKS Preview : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात इंडियन प्रीमियर लीग 2025 चा पाचवा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. गुजरात टायटन्सनं त्यांच्या पहिल्याच हंगामात 2022 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकलं होतं, तर पंजाब किंग्जनं आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकलेलं नाही आणि फक्त दोनदाच प्लेऑफमध्ये पोहोचले आहे.
Matchday mood: 𝑭𝒊𝒓𝒔𝒕 class che! 😍💙 pic.twitter.com/2044QC94bU
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 25, 2025
पंजाबचा संघ कसा : पंजाब किंग्जसाठी खराब सुरुवात विनाशकारी ठरु शकते, कारण भूतकाळात अनेक वेळा संथ सुरुवातीमुळं त्यांच्या हंगामाच्या गतीवर परिणाम झाला आहे. पंजाब किंग्ज (PBKS) पुन्हा एकदा नवीन प्रशिक्षक आणि कर्णधारासह नवीन संघ घेऊन आला आहे. त्यांनी श्रेयस अय्यर, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि युजवेंद्र चहल यांच्यावर मोठी बोली लावली. तरुण खेळाडूंना संधी दिली आणि एक मजबूत संघ तयार केला. हंगाम चांगला जावा म्हणून त्यांना चांगली सुरुवात करावी लागेल.
One day to go. One goal in mind. ⚡💙#AavaDe | #TATAIPL2025 | #GTvPBKS pic.twitter.com/61RDROyQ9u
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 24, 2025
गुजरातचा संघ कसा : दुसरीकडे, गुजरात टायटन्स सातत्य राखण्यावर लक्ष केंद्रित करते आणि हा सामना त्यांच्यासाठी वेगळा असणार नाही. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये विकल्यानंतर 2024 मध्ये शुभमन गिलनं गुजरातचं नेतृत्व स्वीकारलं होतं. त्यानं सलग दुसऱ्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी जॉस बटलर, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, महिपाल लोमरोर असे नवीन खेळाडू संघात सामील झाले आहेत, तर शाहरुख खान, साई सुदर्शन आणि राहुल तेवतिया आधीच संघात आहेत. गोलंदाजीत, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या उपस्थितीमुळं गुजरातचा वेगवान मारा मजबूत दिसतो.
Just Nehraji being Nehraji 🥳
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 24, 2025
Ashish Nehra | #AavaDe | #TATAIPL2025 | #GTvPBKS pic.twitter.com/H8RvRohtqX
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : गुजरात टायटन्स (GT) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात अलिकडच्या काळात मनोरंजक सामने झाले आहे, ज्यात दोन्ही संघांनी काही संस्मरणीय सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 5 सामने झाले आहेत, त्यापैकी गुजरातनं 3 वेळा विजय मिळवला आहे, तर पंजाबनं दोन वेळा विजय मिळवला आहे.
मैदानावर विक्रम कसा : गुजरात टायटन्सनं नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीनदा 199 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत, त्यापैकी पीबीकेएसनं दोनदा त्याचा पाठलाग केला. एकूणच, आयपीएल 2024 मध्ये अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे.
𝑭𝒓𝒐𝒎 𝒑𝒓𝒂𝒚𝒆𝒓𝒔 𝒕𝒐 𝒑𝒍𝒂𝒚𝒆𝒓𝒔, 𝒘𝒆 𝒂𝒓𝒆 𝒂𝒍𝒍 𝒓𝒆𝒂𝒅𝒚! ♥️ #PunjabKings #BasJeetnaHai #GTvPBKS #IPL2025 pic.twitter.com/0o8kB6lSq3
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 25, 2025
GT विरुद्ध PBKS आयपीएलचा पाचवा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज IPL 2025 मधील पाचवा सामना 25 मार्च (मंगळवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल, नाणेफेक सायंकाळी 07:00 वाजता होईल.
GT विरुद्ध PBKS आयपीएलचा पाचवा सामना कुठं आणि कसा पाहायचा?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क भारतात इंडियन प्रीमियर लीग 2025 चं अधिकृत प्रसारण करणार आहे. जिओ आणि स्टार स्पोर्ट्स इंडियाच्या विलीनीकरणानंतर, दर्शक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर आयपीएल सामने पाहू शकतात. याव्यतिरिक्त, ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी JioHotstar ॲपवर फ्रीमध्ये थेट उपलब्ध असेल, जेथे चाहते मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
𝐌𝐚𝐭𝐜𝐡𝐝𝐚𝐲 𝐑𝐞𝐚𝐝𝐲! 😤
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 25, 2025
PS: Shashank's sleep was not disturbed while making this reel. 😉#IPL2025 #PunjabKings #GTvPBKS pic.twitter.com/a2l98DcYNR
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
गुजरात : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुधरसन, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज.
पंजाब : प्रभसिमरन सिंग, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वधेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, मार्को जानसेन, विजयकुमार विशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.
हेही वाचा :