ETV Bharat / sports

अहमदाबादेत 'जॉस द बॉस'...! IPL मध्ये गुजरातनं केला सर्वाधिक धावांचा पाठलाग - GT VS DC MATCH

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या आयपीएलच्या 35व्या सामन्यात गुजरातनं दिल्लीचा पराभव केला आहे.

GT Beat DC
जॉस बटलर (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 19, 2025 at 7:52 PM IST

Updated : April 19, 2025 at 8:06 PM IST

2 Min Read

अहमदाबाद GT Beat DC : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 35व्या सामन्यात गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेटनं पराभव केला आहे. गुजरातचा विजयाचा हिरो जॉस बटलर ठरला. त्यानं आपल्या नाबाद 97 धावांच्या खेळीनं संघाला एकहाती विजय मिळवून दिला. यासह गुजरात टायटन्सनं आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

जॉस द बॉस : दिल्लीनं दिलेल्या 204 धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या गुजरातची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्या षटकात कर्णधार शुभमन गिल हा धावबाद होत पवेलियनमध्ये परतला. मात्र यानंतर साई सुदर्शन आणि जॉस बटलर यांनी डावाची सूत्रे हाती घेत आक्रमक अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर आक्रमक फटका मारण्याच्या नादात साई सुदर्शनही (36) बाद झाला. परंतु एका बाजूनं जॉस बटलर आक्रमक फटके खेळतच होता. यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या रुदरफोर्डनंही आकर्षक फटके मारत जॉस बटलरला साथ दिली आणि संघाचा विजय निश्चित केला. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि मुकेश कुमारनं प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. या विजयासह गुजरातनं यंदाच्या हंगामात पाचवा विजय मिळवत 10 गुणांचं गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

दिल्लीची सांघिक खेळी : या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलनं आपल्या घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून पाहुण्या दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं मिळालेल्या संधीचा फायदा घेत आक्रमक सुरुवात केली. अवघ्या 1.4 षटकात त्यांच्या सलामीवीरांनी 23 धावा केल्या. मात्र यानंतर सलामीवीर अभिषेक पोरेल (18) आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर केएल राहुल (28), करूण नायर (31), अक्षर पटेल (39), आशुतोष शर्मा (37) आणि ट्रीस्टन स्टब्स (31) यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळं दिल्ली संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 203 धावांची मजल मारली. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

गुणतालिकेत धक्का : विशेष म्हणजे दिल्ली संघानं जरी 200 धावांचा टप्पा पार केला असला तरी त्यांच्याकडून एकाही फलंदाजांनं अर्धशतक केलेलं नाही. दिल्ली कॅपिटल्सकडून अशी कामगिरी होण्याची ही इतिहासातील दुसरीच वेळ आहे. मात्र तरीही त्यांना या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तसंच आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 200 हून अधिक धावांचा बचाव करण्यात दिल्लीला अपयश आलं. या पराभवासह दिल्लीला गुणतालिकेत धक्का बसला असून त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

हेही वाचा :

  1. 'या' संघाच्या मालकावर आयुष्यभर बंदी; IPL दरम्यान 'मॅच फॅक्सिंग'विरोधात बीसीसीआयची मोठी कारवाई
  2. बेंगळुरुचं चिन्नास्वामी स्टेडियम RCB साठी अनलकी? PBKS विरुद्ध सामन्यात झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

Last Updated : April 19, 2025 at 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.