लीड्स India All Out on 471 : इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा डाव 471 धावांवर संपला. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी उत्कृष्ट शतकी खेळी केली. टीम इंडियाकडून यशस्वीनं 101 धावा केल्या. त्याच वेळी शुभमन गिल 147 धावा करून बाद झाला तर पंतनं 134 धावा केल्या.

41 धावांत गमावले 7 फलंदाज : टीम इंडिया किमान 500 धावांचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा होती, परंतु खेळाच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिल बाद झाल्यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. एकेकाळी शुभमन गिल बाद झाला तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 430 धावा होता. यानंतर असं वाटत होतं की मधल्या फळीतील फलंदाज भारतीय डाव 500 धावांच्या पलीकडे सहज नेईल, परंतु 41 धावा करताना टीम इंडियानं 7 विकेट्स गमावल्या.
Innings Break! #TeamIndia posted 4⃣7⃣1⃣ on the board! 💪
— BCCI (@BCCI) June 21, 2025
1⃣4⃣7⃣ for captain Shubman Gill
1⃣3⃣4⃣ for vice-captain Rishabh Pant
1⃣0⃣1⃣ for Yashasvi Jaiswal
4⃣2⃣ for KL Rahul
Over to our bowlers now! 👍
Updates ▶️ https://t.co/CuzAEnAMIW #ENGvIND | @ShubmanGill |… pic.twitter.com/mRsXBvzXKx
शुभमन गिल 430 धावांवर बाद : हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघानं 3 विकेट गमावून 359 धावा केल्या होत्या. खेळाच्या पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिल शतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर ऋषभ पंतनं 65 धावांची खेळी केली. अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाला तेव्हा शुभमन आणि पंतनं टीम इंडियाचा डाव ताकदीनं पुढं नेला. या दोघांनी मिळून 400 धावांच्या पुढं धावसंख्या नेली.

मधल्या फळीतील फलंदाज अपयशी : मात्र शुभमन गिल 430 धावांवर बाद झाला. दरम्यान, पंतनं आपलं शतक पूर्ण केलं होतं. पंतच्या शतकानंतर त्यानं जबरदस्त वेग दाखवला, परंतु तो 134 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतच्या विकेटनंतर, इंग्लंड संघानं शानदार पुनरागमन केलं आणि भारतीय फलंदाजांना क्रिजवर टिकू दिलं नाही. इंग्लंडनं एकामागून एक विकेट घेत टीम इंडियाला 471 धावांवर रोखलं.
The situation at the innings break.
— England Cricket (@englandcricket) June 21, 2025
🇮🇳 4️⃣7️⃣1️⃣ pic.twitter.com/jTgEbPdbDc
इंग्लंडची गोलंदाजी कशी : इंग्लंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर कर्णधार स्टोक्स आणि टंगनं गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. इंग्लंडकडून गोलंदाजीत कर्णधार बेन स्टोक्सनं स्वतः उत्कृष्ट कामगिरी केली. बेन स्टोक्सनं 20 षटकांत 66 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय जोश टंगनं 20 षटकांत 86 धावा देत 4 बळी घेतले. स्टोक्स आणि जोश टंगव्यतिरिक्त, इंग्लंडकडून ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.
हेही वाचा :