मुंबई IPL Suspended : जगातील सर्वात मोठी टी-20 लीग, इंडियन प्रीमियर लीगचा 18वा हंगाम अचानक थांबवण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षामुळं, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. 9 मे रोजी, बीसीसीआयनं 58 सामन्यांनंतर स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली. यानंतर आता ही स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरु होत असली तरी 2008 मध्ये सुरु झालेल्या या लीगच्या इतिहासात विविध कारणांमुळं स्पर्धा पुढं ढकलावी लागण्याची ही पहिलीच वेळ नाही.
The decision was taken by the IPL Governing Council after due consultation with all key stakeholders following the representations from most of the franchisees, who conveyed the concern and sentiments of their players, and also the views of the broadcaster, sponsors and fans ;…
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2025
काय म्हणालं होतं बीसीसीआय : स्पर्धा स्थगित केल्यानंतर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं की, "देशात युद्धजन्य परिस्थिती असताना क्रिकेट सुरु आहे हे चांगलं दिसत नाही." तसंच आयपीएलकडून माहिती मिळाली की 18वा हंगाम 7 दिवसांसाठी पुढं ढकलण्यात आला आहे. आयपीएल 2008 मध्ये सुरु झालं आणि तेव्हापासून ही स्पर्धा पुढं ढकलण्याची किंवा स्थगित करण्याची ही सहावी वेळ आहे. ही स्पर्धा मध्यंतरी थांबवण्याची ही दुसरी वेळ आहे, तर आयपीएल सुरु होण्यापूर्वीच एकदा पुढं ढकलण्यात आली होती. आतापर्यंत आयपीएल कधी आणि किती दिवसांसाठी पुढं ढकलण्यात आलं ते जाणून घेऊया...

आयपीएल 2009 :
आयपीएलचा दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत झाला. खरंतर, 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळं, लीगला देशाबाहेर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुका आणि आयपीएलच्या तारखा यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी, ही लीग दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली. त्या हंगामाच्या अंतिम सामन्यात ऍडम गिलक्रिस्टच्या नेतृत्त्वाखाली डेक्कन चार्जर्सनं जेतेपदावर नाव कोरलं.

आयपीएल 2014 :
2009 नंतर 2014 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा लीगच्या तारखा आणि निवडणुकांमध्ये संघर्ष निर्माण झाला. परिणामी लीगचा सातवा हंगाम संयुक्त अरब अमिराती आणि भारतात आयोजित करण्यात आला होता. 2014 च्या आयपीएलचे पहिले 20 सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळले गेले. यानंतर उर्वरित सामने भारतात झाले. 2014 च्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली दुसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदवर नाव कोरलं. त्यांनी त्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला होता.

आयपीएल 2020 :
कोरोना साथीमुळं आयपीएल 2020 यूएईमध्ये खेळवण्यात आले. या काळात खेळाडूंची पूर्ण काळजी घेण्यात आली. कोविड पॉझिटिव्ह खेळाडूंना सामना खेळण्याची परवानगी नव्हती. एवढंच नाही तर खेळाडूंना क्वारंटाइन देखील केलं जातं. या काळात अनेक खेळाडूंनी लीग अर्ध्यावरच सोडली.त्यावेळी ही स्पर्धा 29 मार्च रोजी सुरु होणार होती पण त्याच वेळी कोरोनाव्हायरस साथीनं पहिल्यांदाच जगाला वेढलं. भारतीय बोर्डानं 15 मार्च रोजी ही स्पर्धा 14 एप्रिलपर्यंत पुढं ढकलली होती आणि नंतर 15 एप्रिल रोजी ती अनिश्चित काळासाठी पुढं ढकलली होती. अखेर 174 दिवसांनंतर, 19 सप्टेंबर 2020 रोजी, ही स्पर्धा यूएईमध्ये सुरु झाली आणि पूर्णही झाली. या हंगामाच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं रोहितच्या नेतृत्त्वाखाली चैन्नईला पराभूत करत पाचव्यांदा या स्पर्धेचं जेतेपद जिंकलं.

आयपीएल 2021 :
2021 मध्येही कोरोना विषाणूनं कहर केला. यावेळी बीसीसीआयनं बायो-बबलमध्ये स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली आणि ही स्पर्धा फक्त 3-4 ठिकाणी आयोजित करण्यात आली. 9 एप्रिल रोजी स्पर्धा सुरु झाली. परंतु कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळं 2 मे रोजी होणारा सामना पुढं ढकलण्यात आला. या दरम्यान काही खेळाडूंना विषाणूची लागण झाली आणि त्यानंतर पुढील दोन सामनेही पुढं ढकलण्यात आले. अखेर 5 मे रोजी स्पर्धा पुढं ढकलण्यात आली. यानंतर 19 सप्टेंबर रोजी, पुन्हा एकदा स्पर्धेचा उर्वरित भाग युएईमध्ये सुरु झाला आणि पूर्ण झाला.युएईमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नईनं केकेआरचा पराभव करत चौथ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

आयपीएल 2024 :
2024 चं आयपीएल वेळापत्रक दोन भागात आलं कारण देशातील लोकसभा निवडणुकाही त्याच वेळी होत होत्या. पहिला भाग 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान चालला, ज्यात 21 सामने खेळले गेले. यानंतर, निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यावर, उर्वरित सामने आणि प्लेऑफचे वेळापत्रक तयार करुन खेळवण्यात आले. यामुळं स्पर्धा सुरळीत पार पडली आणि कोणतीही अडचण आली नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट राटडर्सनं सनरायझर्सचा फायनलमध्ये पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली.
हेही वाचा :