हैदराबाद Abhishek Sharma : आयपीएल 2025 च्या 27व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मानं फलंदाजीनं धुमाकूळ घातला. 200 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, अभिषेक शर्मानं ट्रॅव्हिस हेडसह पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना धुडकावून लावलं. पहिल्याच षटकापासून दोन्ही सलामीवीर पंजाब किंग्जच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसत होते. अभिषेक आणि हेड यांनी 4 षटकांतच 60 धावा फटकावल्या. यानंतर, पॉवर प्लेच्या अखेरीस धावसंख्या 83 धावांवर पोहोचली. पुढच्याच षटकात अभिषेक शर्मानं अवघ्या 19 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
𝘼 𝙣𝙤𝙩𝙚-𝙬𝙤𝙧𝙩𝙝𝙮 𝙏𝙊𝙉 💯
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
A stunning maiden #TATAIPL century from Abhishek Sharma keeps #SRH on 🔝 in this chase 💪
Updates ▶ https://t.co/RTe7RlXDRq#TATAIPL | #SRHvPBKS | @SunRisers pic.twitter.com/ANgdm1n86w
अभिषेक शर्मानं झळकावलं तुफानी शतक : 10 षटकांच्या अखेरीस एसआरएचचा स्कोअर 143 धावा होता आणि अभिषेक शर्मानं 32 चेंडूत 87 धावांचा वैयक्तिक स्कोअर गाठला. यानंतर फक्त 2 षटकांनंतर, अभिषेकनं 13व्या षटकात 40 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यानं 6 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केलं आणि शतक मोठ्या शैलीत साजरे केले. शतक पूर्ण केल्यानंतर अभिषेकनं मोठ्यानं ओरडून शतक साजरं केलं. तसंच त्यानं खिशातून एक कागद काढला आणि तो दाखवला. या कागदावर काही संदेश लिहिलेला होता. यानंतर, पंजाबचा कर्णधार श्रेयसनं तो कागद घेतला आणि त्यावर काय लिहिले आहे ते वाचले. यानंतर, रिप्लेमध्ये अभिषेकच्या स्लिपवर लिहिलेलं दिसलं, "हे ऑरेंज आर्मीसाठी आहे". या शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
1⃣4⃣1⃣ reasons why this was a knock for the ages 🫡
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
A look at the records Abhishek Sharma shattered enroute his match-winning 141 (55) 💪 #TATAIPL | #SRHvPBKS | @SunRisers | @SunRisers pic.twitter.com/mRFXjISf82
सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज : या खेळीसह अभिषेक आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. शतक ठोकल्यानंतरही अभिषेक शर्मानं त्याच्या बॅटमधून धावा काढत राहिल्या आणि लवकरच त्यानं 132 धावांचा वैयक्तिक आकडा गाठला. यासह तो आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला. याआधी हा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता. भारताकडून केएल राहुलनं सर्वाधिक 131 धावा केल्या. आता हा विक्रम अभिषेक शर्मानं आपल्या नावावर केला आहे. याशिवाय तो ख्रिस गेल (175*) आणि ब्रेंडन मॅक्युलम (158*) नंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.
Highest IPL Score by an Indian:
— All Cricket Records (@Cric_records45) April 12, 2025
141 - Abhishek Sharma vs PBKS, 2025
132* - KL Rahul vs RCB, 2020
129 - Shubman Gill vs MI, 2023
128* - Rishabh Pant vs SRH, 2018
127 - Murali Vijay vs RR, 2010 pic.twitter.com/ARde1ucPK1
आयपीएलमधील सर्वात जलद शतक :
- 30 चेंडू - ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पीडब्ल्यूआय, 2013
- 37 चेंडू - युसूफ पठाण (आरआर) विरुद्ध एमआय, 2010
- 38 चेंडू - डेव्हिड मिलर (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध आरसीबी, 2013
- 39 चेंडू - ट्रॅव्हिस हेड (एसआरएच) विरुद्ध आरसीबी, 2024
- 39 चेंडू - प्रियांश आर्य (पीबीकेएस) विरुद्ध सीएसके, 2025
- 40 चेंडू - अभिषेक शर्मा (एसआरएच) विरुद्ध पीबीकेएस, 2025*
Abhishek Sharma becomes the first ever player to hit three T20 hundreds in 40 balls or fewer.
— All Cricket Records (@Cric_records45) April 12, 2025
28-ball hundred vs Meghalaya, 2024
37-ball hundred vs England, 2025
40-ball hundred vs PBKS, 2025* pic.twitter.com/u77diEbaG5
आयपीएलमधील सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या :
- 175* - ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पीडब्ल्यूआय, 2013
- 158* - ब्रेंडन मॅक्युलम (केकेआर) विरुद्ध आरसीबी, 2008
- 141 - अभिषेक शर्मा (एसआरएच) विरुद्ध पीबीकेएस, 2025*
- 140* - क्विंटन डी कॉक (एलएसजी) विरुद्ध केकेआर, 2022
- 133* - एबी डिव्हिलियर्स (आरसीबी) विरुद्ध एमआय, 2015
• Most sixes for SRH in an IPL innings
— All Cricket Records (@Cric_records45) April 12, 2025
10 by Abhishek Sharma vs PBKS, 2025
• Most fours for SRH in an IPL innings
14 by Abhishek Sharma vs PBKS, 2025
• Most boundaries for SRH in IPL innings
24 by Abhishek Sharma vs PBKS, 2025 pic.twitter.com/WtoFu2vSUj
आयपीएलमध्ये एसआरएचसाठी सर्वोच्च सलामी भागीदारी :
- 185 - जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर विरुद्ध आरसीबी, 2019
- 171 - अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड विरुद्ध पीबीकेएस, 2025
- 167 - अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड विरुद्ध एलएसजी, 2024
- 160 - जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पीबीकेएस, 2020
Highest Individual Score in IPL
— All Cricket Records (@Cric_records45) April 12, 2025
175* - Chris Gayle v PWI, 2013
158* - Brendon Mccullam v RCB, 2008
141 - Abhishek Sharma v PBKS, 2025*
140* - Quinton Kock v KKR, 2022
133* - Ab de Villiers v MI, 2015
132* - KL Rahul v RCB, 2020 pic.twitter.com/SRfQz7bQFY
टी-20 क्रिकेटमध्ये तीन वेळा केला पराक्रम : अभिषेक शर्मानं आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतकं झळकावली आहेत, जी त्यानं 40 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावली आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अभिषेकनं मेघालयविरुद्ध 28 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्याच वेळी, 2025 मध्ये, त्यानं इंग्लंडविरुद्ध 37 चेंडूत शतक झळकावलं आणि आता त्यानं पंजाब किंग्जविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावलं. यासह तो टी-20 क्रिकेटमध्ये 40 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत तीन शतकं करणारा पहिला फलंदाज बनला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर, श्रीलंकेचा दासुन शनाका आणि भारताचा उर्विल पटेल यांनी टी-20 क्रिकेटमध्ये ४० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये प्रत्येकी दोन शतकं झळकावली आहेत.
Abhishek Sharma - Highest Individual score by an Indian in T20I History.
— All Cricket Records (@Cric_records45) April 12, 2025
Abhishek Sharma - Highest Individual score by an Indian in IPL History.
Abhishek Sharma - Highest Individual score by an SRH player in IPL history. pic.twitter.com/hkHCYAUupI
हेही वाचा :