ब्रिस्टल ENG vs WI 2nd T20I Live Streaming : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज 8 जून (रविवार) रोजी ब्रिस्टल येथील काउंटी ग्राउंडवर खेळला जाईल. पहिल्या सामन्यात इंग्लंडनं वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार विजय नोंदवत मालिकेत 1-0 अशी घेतली. यासह त्यांना जगातील सर्वात मजबूत क्रिकेट संघांपैकी एक का मानलं जातं हे इंग्लिश संघानं सिद्ध केलं. आता या आजच्या सामन्यात यजमान इंग्लंड संघ सामना जिंकत वनडे प्रमाणे ही टी-20 मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल तर पाहुणा विडिंज संघ सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे पाहुण्या संघाला या दौऱ्यात अद्याप सामना जिंकता आलेला नाही.
One of our greatest white-ball players ever 🙌
— England Cricket (@englandcricket) June 6, 2025
Match Highlights: https://t.co/V9253e0g8d#ENGvWI | @JosButtler pic.twitter.com/PoT1tRWXBG
इंग्लंडची मालिकेत आघाडी : नवा कर्णधार हॅरी ब्रुकच्या नेतृत्वाखाली, इंग्लिश संघानं प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले, विशेषतः लियाम डॉवसनच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीनं चेस्टर-ली-स्ट्रीट इथल्या पहिल्या सामन्यातील 21 धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजी आणि गोलंदाजीनं सामन्यावर प्रभाव पाडणाऱ्या डॉवसनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. या विजयासह, इंग्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि वनडे मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास अबाधित आहे.
सामना जिंकत मालिका बरोबरीत करण्याचा प्रयत्न : दुसरीकडे, हा दौरा आतापर्यंत वेस्ट इंडिजसाठी एका वाईट स्वप्नासारखा राहिला आहे. कर्णधार शाय होपच्या नेतृत्वाखाली, कॅरोबियन संघानं अनेक संधी गमावल्या, विशेषतः गोलंदाजांनी, ज्यांनी महत्त्वाच्या क्षणी धावा दिल्या आणि इंग्लंडला पुनरागमन करण्याची पूर्ण संधी दिली. अनेक खेळाडूंनी फलंदाजीत चांगली सुरुवात केली पण ती मोठ्या डावात रुपांतरित करु शकले नाहीत. फक्त एविन लुईसच्या 23 चेंडूत 39 धावा आणि रोमारियो शेफर्डचे 33 धावांत 2 बळी या दोघांनीच काहीसा चांगला खेळ दाखवला. आता वेस्ट इंडिज मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच प्रयत्न करेल.

दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड काय : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात, वेस्ट इंडिज संघानं काहीशी वरचढ कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिज संघानं 18 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, इंग्लंड संघानंही 17 सामने जिंकत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला आहे. तर दोन्ही संघांमधील एक सामना मात्र अनिर्णित राहिला आहे.
Destructive in Durham! 💥
— England Cricket (@englandcricket) June 7, 2025
Buttler blasts 96 🏏
Four wickets for returning Dawson ☝
Full match highlights 👇 pic.twitter.com/lzrsNU7k9R
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज म्हणजेच 08 जून रोजी सायंकाळी 07:00 वाजता काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल इंथ खेळला जाईल. या सामन्याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्याचं थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर लाईव्ह स्ट्रीम सोनी लिव्ह ऍपवर पाहता येईल.
SQUAD UPDATE 🚨
— Windies Cricket (@windiescricket) June 7, 2025
Akeal Hosein will join the squad on Sunday morning ahead of the second T20I against England in Bristol. #ENGvWI | #MenInMaroon pic.twitter.com/RZqT06TYBA
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
इंग्लंड : टॉम बँटन (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), विल जॅक्स, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, मॅथ्यू पॉट्स, ल्यूक वूड, साकिब महमूद.
वेस्ट इंडिज : एविन लुईस, शाई होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शेरफेन रुदरफोर्ड, रोवमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, शिमरॉन हेटमायर, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, गुडाकेश मोती, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ.
हेही वाचा :