मँचेस्टर Eng vs Aus 3rd T20I Weather Forecast : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा T20 सामना आज रविवार 15 सप्टेंबर रोजी एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर इथं खेळवला जाणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळं दोन्ही संघ आज विजयाच्या निर्धारानं मैदानात उतरतील.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्यात हवामान कसं राहिल : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा T20 सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. हवामान अंदाजानुसार, सामन्याच्यावेळी आर्द्रता पातळी 85 टक्के असेल, ज्यामुळं खेळण्याच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो. तसंच रविवारी संध्याकाळी मँचेस्टरमध्ये ढगाळ वाकावरण असण्याची अपेक्षा आहे. हवामान अंदाजानुसार 90 टक्क्यांपेक्षा जास्त ढगाळ राहण्याची अपेक्षा आहे. परंतु, पावसाची फक्त 1 टक्का शक्यता आहे.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्यात खेळपट्टी कशी असेल : ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असण्याची अपेक्षा आहे. या मैदानावर झालेल्या गेल्या पाच टी 20 सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी 179 धावांची आहे. तसंच फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज या दोघांनाही खेळपट्टीवरुन काही मदत मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी निवडू शकतो.
सामन्यासाठी देन्ही संघ :
- इंग्लंडचा टी 20 संघ : फिल सॉल्ट (कर्णधार/यष्टीरक्षक), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (यष्टीरक्षक), सॅम करन, जोश हल, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, आदिल राशिद, रीस टोपली, जॉन टर्नर
- ऑस्ट्रेलिया टी 20 संघ : मिचेल मार्श (कर्णधार), सेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झम्पा
हेही वाचा :