ETV Bharat / sports

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा T20 सामना भारतात कुठं दिसणार लाईव्ह, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर - ENG vs AUS 3rd T20I Live in India

England vs Australia 3rd T20I Live Streaming : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका 11 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या मालिकेत एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. यातील शेवटचा सामना आज होणार आहे.

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 15, 2024, 11:41 AM IST

Updated : Sep 15, 2024, 2:06 PM IST

England vs Australia 3rd T20I
England vs Australia 3rd T20I (Getty Images)

मँचेस्टर England vs Australia 3rd T20I Live Streaming : इंग्लंड क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 सप्टेंबर रोजी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं यजमान इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला. यानंतर 13 सप्टेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडनं तीन विकेट राखत विजय मिळवून मालिकेत बरोबरी केली. यानंतर आज या मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकत दोन्ही संघांचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल.

नवीन खेळाडूंसह इंग्लंड मैदानात : इंग्लंडसाठी, श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच ही टी 20 मालिका सुरु झाली. त्यामुळं यात अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. परिणामी यजमान इंग्लंड संघानं नवीन खेळाडूंसह टी 20 मालिकेला सुरुवात केली. यानंतर पहिल्या सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं, मात्र दपसऱ्या सामन्यात त्यांनी दमदार पुनरागमन करत कांगारुंचा पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी दोन्ही संघ 3 टी 20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. भारतातील अनेक चाहत्यांना हा सामना पाहायची इच्छा आहे, म्हणून हा सामना भारतात कधी, कुठं आणि कसा पाहता येईल ते जाणून द्या.

  • इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी 20 सामना कधी होणार?

उभय संघांमधील तिसरा टी 20 सामना 15 सप्टेंबर रोजी होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल.

  • इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी 20 सामना कुठं खेळला जाईल?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी 20 सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

  • इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी 20 सामन्याचं भारतात कोणते टीव्ही चॅनेल प्रसारण करतील?

भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे.

  • इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी 20 सामन्याचं लाईव्ह स्ट्रीम कशावर?

भारतीय चाहते सोनी लीव्ह ॲप आणि वेबसाइटवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी 20 सामना ऑनलाइन लाईव्ह पाहता येणार आहे.

इंग्लंडचा टी 20 संघ : फिल सॉल्ट (कर्णधार/यष्टीरक्षक), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (यष्टीरक्षक), सॅम करन, जोश हल, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, आदिल राशिद, रीस टोपली, जॉन टर्नर

ऑस्ट्रेलिया टी 20 संघ : मिचेल मार्श (कर्णधार), सेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झम्पा

हेही वाचा :

  1. अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना रद्द, WTC ​च्या पॉइंट टेबलवर काय होणार परिणाम? भारताला फायदा की नुकसान? - WTC Point Table Update
  2. मैदानासोबत तुरुंगाची हवा खाणारे जगातील दिग्गज क्रिकेटपटू; 2011 च्या भारतीय विश्वविजेत्या संघातील दिग्गज खेळाडूचा समावेश - Cricketers Went to Jail

Last Updated : Sep 15, 2024, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.