नॉटिंगहॅम Playing 11 Announced : झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंड क्रिकेट संघानं त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. कर्णधार बेन स्टोक्स तंदुरुस्त झाल्यानंतर संघात परतला आहे आणि तो या सामन्यात इंग्लिश संघाचं नेतृत्व करताना दिसेल. हा कसोटी सामना 22 मे पासून सुरु होईल. दोन्ही संघांमधील हा सामना नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना चार दिवसांचा असून यासाठी इंग्लंडनं दोन दिवसांआधीच प्लेइंग 11 ची घोषणा केली हे विशेष.
🏏 His Test debut
— England Cricket (@englandcricket) May 20, 2025
🏆 Europa League Final
📖 The little book of wickets
Click to watch Sam Cook's first full interview as an England player 👇
वेगवान गोलंदाजाला पदार्पणाची संधी : इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा इसेक्सचा वेगवान गोलंदाज सॅम कुक या सामन्यात पदार्पण करेल. तसंच जोश टंग जवळजवळ दोन वर्षांनी कसोटी संघात परतला आहे. त्यानं इंग्लंडसाठी शेवटचा कसोटी सामना जून 2023 मध्ये लॉर्ड्स इथं झालेल्या अॅशेस कसोटीत खेळला होता. गेल्या काही वर्षांत कुकनं काउंटी सर्किटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यानं आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19.85 च्या सरासरीनं तब्बल 321 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या पाच हंगामात त्यानं इसेक्ससाठी 227 विकेट्स घेतल्या आहेत.
New Test kit passing the vibe check 😎
— England Cricket (@englandcricket) May 21, 2025
Get yours now ahead of the red ball summer 👇
कसा आहे इंग्लिश संघ : याशिवाय इंग्लंड संघात फारसे बदल झालेले नाहीत. झॅक क्रॉली आणि बेन डकेट डावाची सुरुवात करताना दिसतील, तर ऑली पोप तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. मधल्या फळीत संघाकडे जो रुट, हॅरी ब्रुक आणि कर्णधार बेन स्टोक्ससारखे अनुभवी फलंदाज आहेत. जेमी स्मिथ यष्टीरक्षकाची भूमिका साकारताना दिसेल. युवा ऑफस्पिनर शोएब बशीरला आघाडीचा फिरकी गोलंदाज म्हणून निवडण्यात आलं आहे. तर जोश टंग, गस अॅटकिन्सन आणि सॅम कुक यांना वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे.
चार दिवसांचा असेल कसोटी सामना : इंग्लंड आणि झिम्बाब्वेचे संघ जवळजवळ 22 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर एकमेकांविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहेत. विशेष म्हणजे हा कसोटी सामना चार दिवसांचा असेल. दोन्ही संघांमधील शेवटचा कसोटी सामना जून 2003 मध्ये खेळला गेला होता. त्या सामन्यात इंग्लंडनं झिम्बाब्वेचा एक डाव आणि 69 धावांनी पराभव केला होता.
☀️ Our Men's summer starts HERE 🏏
— England Cricket (@englandcricket) May 20, 2025
🧢 The XI to take on @ZimCricketv 🇿🇼
📝 Click for the full story 👇
झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग 11 :
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), गस अॅटकिन्सन, जोश टंग, सॅम कुक, शोएब बशीर
हेही वाचा :