चेस्टर-ली-स्ट्रीट ENG Beat WI : इंग्लंड क्रिकेट संघानं पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 21 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 188 धावा केल्या. यानंतर, वेस्ट इंडिजचा कोणताही खेळाडू मोठी खेळी करु शकला नाही आणि संघ फक्त 167 धावा करु शकला. जॉस बटलर इंग्लंडसाठी सर्वात मोठा हिरो ठरला आणि त्यानं 96 धावांची खेळी केली. त्यानं डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली आणि संपूर्ण मैदानावर फटके मारले.

One of our greatest white-ball players ever 🙌
— England Cricket (@englandcricket) June 6, 2025
Match Highlights: https://t.co/V9253e0g8d#ENGvWI | @JosButtler pic.twitter.com/PoT1tRWXBG
इंग्लंडची प्रथम फलंदाजी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र डावाच्या दुसऱ्या षटकात बेन डकेट पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा त्याचा निर्णय काही काळासाठी चुकीचा ठरल्याचं दिसून आले. यानंतर, जेमी स्मिथ आणि जॉस बटलर यांनी इंग्लंडच्या डावाची सूत्रं हाती घेतली आणि दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 39 चेंडूत 79 धावांची भागीदारी केली. बटलरनं 59 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 96 धावांची खेळी केली. तो केवळ 4 धावांनी आपलं शतक पूर्ण करु शकला नाही आणि जोसेफचा बळी ठरला.

जॉस बटलर नर्व्हस नाइंटिजचा बळी : बटलर व्यतिरिक्त, सलामीवीर जेमी स्मिथनं 20 चेंडूत 38 धावा केल्या. तर जेकब बेथेलनं 23 चेंडूत 23 धावांची खेळी केली. अशाप्रकारे इंग्लंडनं 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्डनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नर्व्हस नाइंटीजमध्ये आउट होणारा जॉस बटलर इंग्लंडचा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. एकूणच, तो टी-20 मध्ये नर्व्हस नाइंटीजचा बळी पडलेला इंग्लंडचा चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी अॅलेक्स हेल्स, इऑन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टो हे टी-20 मध्ये नर्व्हस नाइंटीजमध्ये आउट झाले आहेत.
Destructive in Durham! 💥
— England Cricket (@englandcricket) June 6, 2025
Buttler at his best 🏏
Dawson shines on return ⭐
Full match highlights 👇
लियाम डॉवसनची घातक गोलंदाजी : इंग्लंडनं दिलेल्या 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघानं स्थिर सुरुवात केली. एविन लुईस आणि जॉन्सन चार्ल्स यांनी पहिल्या विकेटसाठी 20 चेंडूत 27 धावा जोडल्या, पण त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव डळमळीत होऊ लागला. नियमित अंतरानं त्यांनी विकेट गमावल्या. एविन लुईस वगळता, कोणताही फलंदाज विकेटवर टिकू शकला नाही आणि संघ 20 षटकांत 9 गडी बाद फक्त 167 धावा करु शकला आणि 21 धावांनी सामना गमावला.
The PERFECT start to the series 👌
— England Cricket (@englandcricket) June 6, 2025
Victory in Durham ✅
Game two in Bristol 🔜
Match Centre: https://t.co/LDkylcYeB5 pic.twitter.com/Mc56WuXDBJ
लियाम डॉवसन सामनावीर : लुईसनं 23 चेंडूत 39 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून लियाम डॉवसननं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांत फक्त 20 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. मॅथ्यू पॉट्स आणि जेकब बेथेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. लियाम डॉवसनला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. मालिकेतील दुसरा सामना रविवार 8 जून रोजी खेळवला जाणार आहे.
A confident England claim first blood in the #ENGvWI men's T20I series 🙌
— ICC (@ICC) June 7, 2025
Scorecard 📱 https://t.co/cEyWFCTTxs pic.twitter.com/9Fy3JaULVf
हेही वाचा :