ट्रेंट ब्रिज ENG vs ZIM Only Test Day 1 Live : आज 22 मे पासून ट्रेंट ब्रिज इथं इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात चार दिवसीय एकमेव कसोटी सामना सुरु झाला आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वे 22 वर्षांच्या अंतरानंतर इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याद्वारे इंग्लंड नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात उत्साहात करण्याचा प्रयत्न करेल, तर झिम्बाब्वे अलीकडेच बांगलादेशमध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीनंतर इंग्लंडमध्ये अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात पाहुण्या झिम्बाब्वे संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी डावाची सुरुवात केली आहे.
Zimbabwe won the toss and and elected to bowl first against England. 🪙#ENGvZIM #ExperienceZimbabwe pic.twitter.com/37GsVVy8ii
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) May 22, 2025
चार दिवसांचा असेल कसोटी सामना : इंग्लंड आणि झिम्बाब्वेचे संघ जवळजवळ 22 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर एकमेकांविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहेत. विशेष म्हणजे हा कसोटी सामना चार दिवसांचा असेल. दोन्ही संघांमधील शेवटचा कसोटी सामना जून 2003 मध्ये खेळला गेला होता. त्या सामन्यात इंग्लंडनं झिम्बाब्वेचा एक डाव आणि 69 धावांनी पराभव केला होता.
Zimbabwe Playing XI ✍️#ENGvZIM #ExperienceZimbabwe pic.twitter.com/Oganl43yZJ
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) May 22, 2025
सामन्यासाठी दोन्ही संघ :
इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), गस अॅटकिन्सन, जोश टंग, सॅम कुक, शोएब बशीर
झिम्बाब्वे : बेन कुरन, ब्रायन बेनेट, क्रेग एर्विन (कर्णधार), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, वेस्ली माधेवरे, तफादज्वा त्सिगा (यष्टीरक्षक), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तनाका चिवांगा, व्हिक्टर न्यांची
A special moment before the start of play as Sam Cook receives his first Test cap from @StuartBroad8 🥰
— England Cricket (@englandcricket) May 22, 2025
Go well today, Cooky 👊 pic.twitter.com/gFuIYpTWYD
वेगवान गोलंदाजाला पदार्पणाची संधी : इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा इसेक्सचा वेगवान गोलंदाज सॅम कुक या सामन्यात पदार्पण करेल. तसंच जोश टंग जवळजवळ दोन वर्षांनी कसोटी संघात परतला आहे. त्यानं इंग्लंडसाठी शेवटचा कसोटी सामना जून 2023 मध्ये लॉर्ड्स इथं झालेल्या अॅशेस कसोटीत खेळला होता. गेल्या काही वर्षांत कुकनं काउंटी सर्किटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यानं आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19.85 च्या सरासरीनं तब्बल 321 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या पाच हंगामात त्यानं इसेक्ससाठी 227 विकेट्स घेतल्या आहेत.
We're underway in our first Test of the summer 🤩
— England Cricket (@englandcricket) May 22, 2025
Follow along now via our Match Centre 👇
हेही वाचा :