लीड्स ENG vs IND 1st Test Day 1 : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पूर्णपणे भारतीय क्रिकेट संघाच्या नावावर राहिला. नाणेफेक वगळता इंग्लंडच्या बाजूनं काहीही गेलं नाही. भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल तसंच कर्णधार शुभमन गिल यांनी वयक्तिक शतकं झळकावली. परिणामी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 85 षटकांत 3 बाद 359 होती. कर्णधार गिल 175 चेंडूत 127 धावांवर नाबाद आहे, तर उपकर्णधार ऋषभ पंतनंही अर्धशतक झळकावलं आहे. पंत 102 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 65 धावांवर खेळत आहे.

भारताची संयमी सुरुवात : दिवसाच्या पहिल्या सत्रात, सलामीवीर केएल राहुल (42 धावा) आणि जैस्वाल यांनी इंग्लंडच्या आक्रमणाचा जोरदार सामना केला आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावा जोडून चांगली सुरुवात केली. 39 वर्षांनंतर, भारतीय सलामीवीर जोडीनं लीड्सच्या मैदानावर अर्धशतकी भागीदारी केली आहे. इंग्लंडचे गोलंदाज स्टोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि ख्रिस वोक्स यांनी राहुल आणि जैस्वाल यांना फुल लेंथ गोलंदाजी केली, ज्यामुळं त्यांना काही सोप्या धावा मिळाल्या.
📸 In frame:
— BCCI (@BCCI) June 20, 2025
Two Centurions from Day 1 in Headingley 🤩#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill | @ybj_19 pic.twitter.com/TB4psqEtt4
कर्णधारपदाच्या पदार्पणात गिलचं शतक : दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यशस्वी जैस्वालनं 144 चेंडूत 16 चौकार आणि एक षटकार ठोकून आपलं पाचवं शतक पूर्ण केलं. चहापानाच्या ब्रेकनंतर तो 101 धावा काढून बाद झाला. तर शुभमन गिलनं दिवसाच्या शेवटच्या सत्रात आपलं शतक पूर्ण केलं. कसोटी कर्णधार म्हणून गिलचा हा पहिलाच सामना आहे. कर्णधारपदाच्या पदार्पणात कसोटी शतक करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी विजय हजारे, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. यासह भारतीय संघाच्या दोन फलंदाजांनी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शतकी खेळी करण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. यापुर्वी 2001 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 2017 श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाच्या फलंदाजांनी ही कामगिरी केली होती.
Stumps on the opening day of the 1st Test!
— BCCI (@BCCI) June 20, 2025
An excellent day with the bat as #TeamIndia reach 359/3 🙌
Captain Shubman Gill (127*) and Vice-captain Rishabh Pant (65*) at the crease 🤝
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/kMTaCwYkYo
दुसऱ्या सत्रात एकही विकेट पडली नाही : दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीपूर्वी भारताला सलग दोन षटकांत दोन झटके सहन करावे लागले. पहिल्या सत्रात कार्सेनं केएल राहुलला बाद केलं. जो रुटनं त्याला स्लिपमध्ये झेलबाद केलं. त्यानंतर, पदार्पण करणारा साई सुदर्शन खातंही उघडू शकला नाही. कर्णधार बेन स्टोक्सनं सापळा रचला आणि त्याला बाद केलं. पहिल्या सत्रानंतर, भारताची धावसंख्या 2 बाद 92 धावा होती. दुसरं सत्र पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर होतं. यामध्ये इंग्लिश गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.
Yashasvi Jaiswal and Shubman Gill score hundreds as Indian batters make merry on the opening day in Leeds 💪#ENGvIND 📝: https://t.co/FXxW1HkGLm pic.twitter.com/PE8oiAa2Aj
— ICC (@ICC) June 20, 2025
पंत आणि गिलमध्ये शतकी भागीदारी : कर्णधार बेन स्टोक्सनं यशस्वी आणि गिलची भागीदारी मोडली. त्यानं यशस्वी जैस्वालला बाद केलं. दोघांमध्ये 128 धावांची भागीदारी झाली. पण त्यानंतरही इंग्लंडच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. ऋषभ पंतनं सुरुवातीला सावध फलंदाजी केली पण नंतर हात उघडण्यास सुरुवात केली. 81व्या षटकात त्यानं 91 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पंत आणि गिलमध्ये 198 चेंडूत 138 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे.
First Test century as India 𝓬𝓪𝓹𝓽𝓪𝓲𝓷 for Shubman Gill 💯#ENGvIND 📝: https://t.co/FXxW1HkGLm pic.twitter.com/dkaDdWvsmH
— ICC (@ICC) June 20, 2025
हेही वाचा :