ETV Bharat / sports

दिल्लीचा विजयी 'सिक्सर'... लखनऊच्या नवाबांच्या दुसऱ्यांदा पराभव - LSG VS DC

आयपीएल 2025 च्या 40व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सनं लखनऊ सुपरजायंट्सचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात केएल राहुलनं त्याच्या जुन्या संघाविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावलं.

DC Beat LSG
दिल्ली कॅपिटल्स (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 23, 2025 at 9:36 AM IST

2 Min Read

लखनऊ DC Beat LSG : आयपीएल 2025 च्या 40व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सनं लखनऊ सुपरजायंट्सचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात केएल राहुलनं त्याच्या जुन्या संघाविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावलं. राहुलनं नाबाद 57 धावा केल्या. त्याच्याशिवाय मुकेश कुमारनं गोलंदाजीतील कौशल्य दाखवलं आणि सर्वाधिक 4 बळी घेतले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊचा संघ फक्त 159 धावा करु शकला, प्रत्युत्तरात दिल्लीनं 2 विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं. दिल्लीनं 17.5 षटकांत विजय मिळवला, केएल राहुलनं षटकार मारुन सामना संपवला.

दिल्लीचा सहावा विजय : दिल्लीच्या संघानं हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये आपलं स्थान मजबूत केलं. दिल्लीनं 8 सामन्यांत सहावा विजय मिळवला आहे. पॉइंट टेबलमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात संघानं 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत पण नेट रन रेटच्या बाबतीत ते दिल्लीपेक्षा पुढं आहे. त्यामुळं ते अव्वल स्थानावर आहेत.

लखनऊचे फलंदाज अपयशी : सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा कर्णधार अक्षर पटेलनं नाणेफेक जिंकली आणि त्यानं लखनऊच्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊच्या समस्या इथून सुरु झाल्या, जरी त्यांचे सलामीवीर मार्करम आणि मिशेल मार्श यांनी चांगली सुरुवात करुन दिल्लीला काही ताण दिला. दोघांनी 10 षटकांत 87 धावा जोडल्या. मार्करामनं शानदार अर्धशतक झळकावलं पण 33 चेंडूत 52 धावा काढून तो बाद झाला. ही सलामी जोडी तुटताच लखनऊचा संघ मोठ्या अडचणीत सापडला. निकोलस पूरन 9 धावा काढून बाद झाला. अब्दुल समद फक्त 2 धावा करु शकला. बदोनीनं 21 चेंडूत 36 धावा करुन संघाला 159 धावांपर्यंत पोहोचवलं पण त्याच्याशिवाय मिलर 15 चेंडूत फक्त 14 धावा करू शकला. पंतनं 2 चेंडू खेळले आणि त्याला खातंही उघडता आलं नाही. दिल्लीकडून वेगवान गोलंदाज मुकेश कुमारनं 33 धावा देऊन 4 बळी घेतले.

दिल्ली कॅपिटल्सनं सहज गाठली धावसंख्या : दिल्ली कॅपिटल्सना या धावसंख्याचा पाठलाग करताना कोणतीही अडचण आली नाही कारण करुण नायर आणि अभिषेक पोरेल यांनी संघाला जलद सुरुवात दिली. दोघांनीही 22 चेंडूत 36 धावा जोडल्या. करुण नायर 15 धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर अभिषेक पोरेल आणि केएल राहुल यांनी चांगली भागीदारी करत लखनऊला सामन्यातून बाहेर काढलं. पोरेलनं 36 चेंडूत 51 धावा केल्या, तर केएल राहुलनं 42 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या. उर्वरित काम अक्षर पटेलनं केलं ज्यानं 20 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या.

हेही वाचा :

  1. IPL सामन्यात उत्साह वाढवणाऱ्या चीअरलीडर्संना किती पगार मिळतो? कशी होते त्यांची निवड?
  2. IPL मध्ये पुन्हा एकदा फिक्सिंगचा 'बॉम्ब'; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.