चेन्नई CSK vs KKR : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची कामगिरी आतापर्यंत खूपच निराशाजनक राहिली आहे. त्यांनी हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 विकेटनं विजय मिळवून केली खरी पण त्यानंतर चेन्नईनं सलग चार सामने गमावले आहेत. पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या सीएसके संघानं या हंगामात पूर्वीसारखा उत्साह दाखवलेला नाही. या हंगामात संघानं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात खराब कामगिरी केली आहे.
Mark chodo … gale milo! 🫂💛#IntoTheKingsVerse 🥳#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/FICpx5eA5S
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 10, 2025
संघात बदलांची शक्यता : या हंगामात चेन्नई संघाकडे पाहता असं दिसतं की ते ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे सारख्या खेळाडूंवर खूप अवलंबून आहेत. त्यानं काही खेळाडूंना सातत्यानं संधी दिल्या आहेत पण त्यांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईचा पुढचा सामना आता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहे. जर सीएसकेला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल, तर त्यांना केकेआरविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नईला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करावे लागतील.
Heads high, hearts stronger! 💛#PBKSvCSK #WhistlePodu #Yellove🦁💛 pic.twitter.com/6qbnF3YfOg
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 9, 2025
मुकेश चौधरीच्या जागी गुर्जपनीत सिंगला संधी मिळू शकते : मुकेश चौधरी आयपीएलच्या चालू हंगामात प्रभावी सिद्ध झालेला नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज नवीन चेंडूनं विकेट्स घेऊ शकला नाही. त्याचा अलीकडील फॉर्म आणि लय लक्षात घेता, चेन्नई त्याला अंतिम अकरामधून वगळू शकते. सीएसकेकडे संघात इतर काही चांगले गोलंदाज आहेत. आयपीएल 2025 सुरु होण्यापूर्वी तमिळनाडूसाठी चांगली गोलंदाजी करणाऱ्या गुर्जपनीत सिंगला मुकेशच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. मुकेशप्रमाणेच गुर्जपनीत सिंग हाही डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो त्याच्यासारखाच बदली होऊ शकतो.
Focus first. Fire later. 🔥 pic.twitter.com/bfiCR4EpD3
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 10, 2025
श्रेयस गोपाल घेणार अश्विनची जागा : आयपीएल 2025 च्या आधी झालेल्या मेगा लिलावात चेन्नई फ्रँचायझीनं रविचंद्रन अश्विनला 9.75 कोटी रुपयांना मोठ्या अपेक्षांसह खरेदी केलं होतं. पण ऑफ-स्पिनर अश्विनला या हंगामात गोलंदाजीत अद्याप काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यानं आयपीएल 2025 मध्ये निश्चितच 5 विकेट्स घेतल्या आहेत पण तो खूप महागडा ठरत आहे. अशा परिस्थितीत, त्याला वगळून श्रेयस गोपालला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केलं जाऊ शकते. लेग स्पिनर श्रेयस गोपाल संघासाठी विकेट घेण्याचा पर्याय ठरु शकतो. या हंगामात नूर अहमद CSK साठी मधल्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे पण त्याला दुसऱ्या टोकाच्या इतर गोलंदाजांकडून पाठिंबा मिळत नाहीये. अशा परिस्थितीत, नूर अहमद आणि श्रेयस गोपालची जोडी सीएसकेसाठी प्रभावी ठरु शकते.
Landed in Chennai to a sea of love 💜🙌 pic.twitter.com/WJd6nGzMq4
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 10, 2025
विजय शंकरच्या जागी शेख रशीदला संधी मिळू शकते : सीएसकेनं दीपक हुड्डाच्या जागी विजय शंकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केलं. परंतु तोही काही विशेष कामगिरी करु शकला नाही. त्यानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं, पण त्या डावात त्याचा हेतू दिसत नव्हता. गरज असताना तो जलद गतीनं धावा काढू शकला नाही. अशा परिस्थितीत, सीएसके त्याच्या जागी 20 वर्षीय युवा खेळाडू शेख रशीदला संधी देऊ शकते. 2022 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात रशीदनं भारतासाठी चांगली कामगिरी केली. गरज पडल्यास तो जलद गतीनं धावा काढू शकतो आणि विकेट एकामागून एक पडत असताना संयमानं फलंदाजी कशी करायची हे त्याला माहिती आहे. अशा परिस्थितीत, तो मधल्या फळीत सीएसकेसाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो.
हेही वाचा :