ETV Bharat / sports

'क्रिकेटच्या देवा'नं केलं कुस्तीपटू विनेश फोगटचं समर्थन; नियमांवरच प्रश्न उपस्थित करत केली मोठी मागणी - Sachin Tendulkar on Vinesh Phogat

Sachin Tendulkar on Vinesh Disqualification : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही विनेश फोगटच्या समर्थनार्थ पुढं आला आहे. त्यानं थेट नियमांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच मोठी मागणीही केली.

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 9, 2024, 6:55 PM IST

Sachin Tendulkar
सचिननं केलं विनेशचं समर्थन (ANI and ETV Bharat)

मुंबई Sachin Tendulkar on Vinesh Disqualification : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटसाठी गेले काही दिवस निराशाजनक गेले. आता 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरही विनेशच्या समर्थनार्थ पुढं आला आहे. महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी विनेशचं वजन निर्धारित मानकांपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं लक्षात आलं, त्यामुळं तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं होतं. आता सचिननं याबाबत नाराजी व्यक्त केली असून विनेश रौप्यपदकाची पूर्णपणे दावेदार असल्याचं म्हटलं आहे.

सचिननं व्यक्त केली नाराजी : सचिन तेंडुलकरनं विनेशच्या समर्थनार्थ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, "प्रत्येक खेळाचे नियम असतात आणि त्या नियमांना संदर्भानं पाहिलं पाहिजे. विनेश फोगटनं कोणतीही बेईमानी न करता अंतिम फेरी गाठली होती. वजनामुळं झालेली तिची अपात्रता अंतिम सामन्यापूर्वी आलेली आहे. म्हणून मला वाटतं की तिला रौप्यपदक न देणं हा निव्वळ अप्रामाणिकपणा असेल आणि अशा नियमांना काही अर्थ नाही." तसंच विनेश फोगटनं पहिल्याच फेरीत गत ऑलिम्पिक चॅम्पियनला पराभूत करुन सर्वांनाच थक्क केलं होतं. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि अंतिम फेरीतही तिनं कोणतंही फाऊल न करता सामना जिंकला. अशा स्थितीत तिला निदान रौप्यपदक तरी का देऊ नये? नियमानुसार, तिला पुन्हा अंतिम फेरीत भाग घेण्याची परवानगी नव्हती, परंतु तिला रौप्यपदकापासून वंचित ठेवणं पूर्णपणं अन्यायकारक असल्याचं सचिननं म्हटलंय.

अशा नियमांना काही अर्थ नाही : जर एखादा खेळाडू ड्रग्ज घेताना किंवा बेईमानी करताना पकडला गेला तर त्याला अपात्र ठरवावं लागेल. पण विनेशच्या बाबतीत असं काहीही झालं नाही. कोणत्याही खेळाडूनं ड्रग्ज घेताना किंवा धोरणाच्या आधारावर अप्रामाणिकपणा करताना पकडलं तर त्याला अपात्र ठरवणं योग्य ठरेल. पण विनेशनं कोणतीही फसवणूक न करता तिच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आहे, त्यामुळं ती रौप्यपदकासाठी पात्र असल्याचही सचिन तेंडुलकरनं म्हटलंय.

हेही वाचा :

  1. कुस्तीपटू विनेश फोगटला अजूनही मिळू शकतं 'सिल्वर मेडल'? आज होणार मोठा निर्णय - Paris Olympics 2024
  2. विनेश फोगटचं 52 किलो होते वजन, रात्रभर प्रयत्न केले, केसंही कापले, पण...; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली 'इनसाईड स्टोरी' - Vinesh Phogat Disqualified
  3. भारताला मोठा धक्का... अंतिम सामन्यात पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी अपात्र, कारण काय? - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.