लखनऊ SRH Batter Travis Head : आयपीएल 2025 चा हंगाम पुन्हा सुरु झाला आहे पण यादरम्यान एक धक्कादायक बातमी आली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या एका दिग्गज परदेशी खेळाडूला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळं तो वेळेवर भारतात येऊ शकला नाही आणि संघाच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिट्टोरी यांनी रविवारी खुलासा केला की संघाचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळं तो वेळेवर भारतात परतू शकला नाही आणि संघाच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही.
Travis Head tested positive for COVID19.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 18, 2025
- He's unlikely to play Vs LSG. pic.twitter.com/hMOZFH86Mm
ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियाहून परतला नाही : भारत-पाकिस्तान तणावामुळं आयपीएल 2025 मध्येच थांबवण्यात आलं. यामुळं सर्व परदेशी खेळाडू आपापल्या घरी परतले. ट्रॅव्हिस हेड देखील त्याच्या देश ऑस्ट्रेलियाला परतला. आयपीएल पुन्हा सुरु झाल्यावर त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स भारतात परतला, पण ट्रॅव्हिस हेड परतला नाही. याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटलं आणि आता त्यामागील कारण सर्वांनाच कळलं आहे. सनरायझर्सचा पुढील सामना आज सोमवार, 19 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सशी होईल पण हेड त्यात सहभागी होऊ शकणार नाही.
Travis Head to miss IPL as he's detected with Covid-19!
— The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) May 19, 2025
Is the Chinese virus coming back? pic.twitter.com/OE9IIAFY9N
काय म्हणाले प्रशिक्षक : सनरायझर्सचे प्रशिक्षक व्हेटोरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत खुलासा केला की ऑस्ट्रेलियामध्ये असताना हेडला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. यामुळं तो ताबडतोब भारतात परतू शकत नाही आणि आता सोमवारी सकाळीच इथं पोहोचेल, असं व्हिट्टोरी म्हणाले. यामुळं तो आजच्या लखनऊविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही पण तो पुढील सामन्यात खेळेल की नाही हे चौकशीनंतरच ठरवलं जाईल. मात्र हेडच्या अनुपस्थितीचा हैदराबादवर फारसा परिणाम होणार नाही कारण संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचू शकत नाही.
🚨Shocking : Australian Cricketer Travis Head tested positive for Covid.
— The Frustrated Indian (@FrustIndian) May 18, 2025
He is set to miss the remainder of IPL 2025. pic.twitter.com/QCTBSlB84t
4 वर्षांनंतर आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव : आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या 4 वर्षात आयपीएलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी, आयपीएल 2021 च्या हंगामात कोरोना व्हायरसची प्रकरणं आढळली होती. यामुळं स्पर्धा मध्येच थांबवावी लागली आणि काही महिन्यांनी उर्वरित स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली. तेव्हापासून, पुढील तीन हंगाम कोणत्याही अडचणीशिवाय गेले. जरी यावेळीही हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील आयपीएलच्या बाहेर आले असलं तरी त्यामुळं आयपीएलचे उर्वरित संघही सतर्क राहतील.
हेही वाचा :