दुबई Champions Trophy 2025 Live Streaming : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, जेव्हा यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर येतील. टीम इंडियाबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय क्रिकेट संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशशी सामना करताना पहिला सामना खेळेल. दरम्यान, तुमच्या मनात ही गोष्ट येत असेल की तुम्ही तुमच्या मोबाईल आणि टीव्हीवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कसे पाहू शकता. तसंच आता एक नवीन ॲप देखील लाँच करण्यात आलं आहे.
19 days of non-stop incredible cricket 😍
— ICC (@ICC) February 15, 2025
Details on how to watch #ChampionsTrophy 2025 ⬇️https://t.co/0mCzdMwGPV
जिओ हॉटस्टारवर पाहता येणार चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने : मोबाईलवर जिओ हॉटस्टारवर भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळले गेलेले वनडे मालिका सामने पाहिले. पण तुम्हाला माहित असेलच की आता हे ॲप बदललं आहे. म्हणजेच डिस्ने प्लस हॉटस्टारचं नाव बदलून जिओहॉटस्टार करण्यात आलं आहे. इतरांप्रमाणे, तुमचं ॲप देखील आता अपडेट झालं असेल आणि नवीन लोगो देखील दिसला असेल. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या ॲपवर तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे फ्रीमध्ये पाहू शकाल. जर तुम्हाला टीव्हीवर सामने पाहत असतील तर काहीच अडचण नाही. तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह सामने पाहू शकता. तुम्ही स्पोर्ट्स 18 वर सामना किंवा त्याचे हायलाइट्स देखील पाहू शकता. जरी याबद्दल आत्ताच काही निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु याची शक्यता खूप जास्त आहे.
कसं आहे टीम इंडियाचं लीग स्टेजमधील वेळापत्रक : अशा परिस्थितीत, जर तुमच्या मोबाईलवर डिस्ने प्लस हॉट स्टारचा लोगो बदललेला दिसत असेल आणि नावही बदलले असेल, तर काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही त्याच ॲपवर सामना लाईव्ह पाहू शकता. टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी आहे, जसं आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं आहे. यानंतर, 23 फेब्रुवारी रोजी मोठा सामना खेळला जाईल, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांसमोर येतील. यानंतर, भारताला 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध लीग टप्प्यातील शेवटचा सामना खेळायचा आहे. हे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील.
Captain Cool on the field 😌
— Star Sports (@StarSportsIndia) January 29, 2025
Captain Cool as a fan 🥵
With every match do-or-die in the #ChampionsTrophy, even @msdhoni needs a DRS (Dhoni Refrigeration System) to beat the heat! 👊
📺 #ChampionsTrophyOnJioStar STARTS WED, 19 FEB 2025! | #CaptainNotSoCool pic.twitter.com/nv1XXZoHht
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक :
- 20 फेब्रुवारी : भारत विरुद्ध बांगलादेश (दुपारी 2:30 भारतीय प्रमाण वेळेनुसार)
- 23 फेब्रुवारी : भारत विरुद्ध पाकिस्तान (दुपारी 2:30 भारतीय प्रमाणवेळेनुसार)
- 2 मार्च : भारत विरुद्ध न्यूझीलंड (दुपारी 2:30 भारतीय वेळेनुसार)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
हेही वाचा :