लीड्स Shubman Gill Finned by ICC : इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार शुभमन गिलचा लौकिक दिसून आला. कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच कसोटी डावात शुभमननं शतक झळकावलं. शुभमनच्या कसोटी कारकिर्दीतील हे सहावं शतक होतं. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद राहिल्यावर तो सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 147 धावांवर बाद झाला. त्यानं 227 चेंडूंचा सामना करत 19 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्या या खेळीमुळं भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

वेगळ्या कारणामुळं गिल चर्चेत : शुभमन गिलच्या या शानदार शतकाची खूप चर्चा होत आहे. मात्र यासह भारतीय कर्णधार खेळाच्या पहिल्या दिवशी (20 जून) आणखी एका कारणामुळं चर्चेत होता. खरं तर, या सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन काळे सॉक्स (मोजे) घालून फलंदाजीसाठी आला होता, जे आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन मानलं जात आहे.

काय आहे ICC चा नियम : आयसीसीच्या कपडे आणि उपकरण नियमांच्या कलम 19.45 नुसार, कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंना पांढरे, क्रीम किंवा हलके राखाडी रंगाचे सॉक्स (मोजे) घालावे लागतात. पण शुभमन गिल काळ्या रंगाचे सॉक्स घालून फलंदाजी करायला आला. वास्तविक मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या शिफारशींनंतर मे 2023 पासून हा नियम लागू झाला.

काय होईल शिक्षा : आता याबाबत शुभमन गिलवर काय कारवाई होणार हे मॅच रेफरी रिची रिचर्डसन काय निर्णय घेतात यावर अवलंबून असेल. जर मॅच रेफ्रींना असं वाटलं की शुभमननं जाणूनबुजून लेव्हल-1 चा गुन्हा केला आहे, तर भारतीय कर्णधाराला दंड होऊ शकतो, जो 0 ते 50 टक्के असू शकतो. मात्र जर पंचांना असं वाटलं की शुभमन गिलनं हे अनावधानानं किंवा परिस्थितीमुळं केलं (उदा. पांढरे सॉक्स ओले होते), तर तो दंडातून वाचू शकतो.
दंड होण्याची शक्यता : आयसीसी लेव्हल-1 च्या गुन्ह्यांसाठी, खेळाडूंना 0 ते 50 टक्के दंड आणि डिमेरिट पॉइंट्स मिळू शकतात. लेव्हल-2 च्या गुन्ह्यासाठी, खेळाडूला 50 ते 100 टक्के दंड आणि बंदी घातली जाऊ शकते (उदाहरणार्थ, 1 कसोटी किंवा 2 वनडे सामने). मात्र ड्रेस कोडशी संबंधित प्रकरणं क्वचितच लेव्हल-2 गुन्ह्यांमध्ये येतात.

आयसीसीच्या कपडे आणि उपकरण नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत कोणत्या खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे?
* 2016 मध्ये, क्रिस गेलनं बिग बॅश लीग (BBL) च्या एका सामन्यात काळ्या बॅटचा वापर केला होता, जो नियमांविरुद्ध होता. त्यानंतर गेलला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला.
* 2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात, केएल राहुल हेल्मेट घालून आला होता जो आयसीसीच्या नियमांविरुद्ध होता. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या सामना शुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला.
* 2019 च्या वनडे विश्वचषकादरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज इमाम-उल-हक त्याच्या बॅटवर लोगो घेऊन मैदानात आला होता, जो आयसीसीच्या नियमांविरुद्ध होता. इमामला त्याच्या सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला.
* 2021 जो रुटनं मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जर्सीवर इंद्रधनुष्याचं चिन्ह घातलं होतं, जे LGBTQ+ समुदायाच्या समर्थनार्थ होतं. यामुळं त्याला त्याच्या सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.
हेही वाचा :