चेन्नई Qualification Equation for CSK : चेन्नई सुपर किंग्जसाठी आतापर्यंत आयपीएल 2025 खूप वाईट राहिलं आहे. सीएसकेनं पहिल्या 6 पैकी 5 सामने गमावले आहेत. या हंगामातील पहिला सामना चेन्नईनं जिंकला होता. मात्र यानंतर त्यांनी सलग 5 सामने गमावले आहेत. आयपीएलमध्ये सीएसकेनं सलग इतके सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघ घरच्या मैदानावरही जिंकू शकत नाही. चेपॉक इथं सीएसकेनं मागील तीनही सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या लज्जास्पद कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे का आणि मुंबई इंडियन्ससारखा चमत्कार पुन्हा करु शकेल का?
Clinical with the ball, fiery with the bat 🫡 🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2025
A superb all-round performance earns Sunil Narine the Player of the Match award 🔝
Scorecard ▶ https://t.co/gPLIYGimQn#TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/ofafkXbOUO
सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? : आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये, सीएसके संघ सध्या 6 सामन्यांत 1 विजय आणि 2 गुणांसह 9व्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रन रेट उणे 1.554 आहे. मात्र या खराब कामगिरीनंतरही, ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले नाही. पण प्लेऑफमध्ये पोहोचणे हे सीएसकेसाठी चमत्कारापेक्षा कमी असणार नाही. आयपीएलच्या लीग टप्प्यात, सर्व संघ 14-14 सामने खेळतात, त्यामुळं सीएसकेकडे अजूनही 8 सामने शिल्लक आहेत. जर संघानं उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली तर ते हंगामात पुनरागमन करु शकतात.
Game set and done in a thumping style ✅@KKRiders with a 𝙆𝙣𝙞𝙜𝙝𝙩 to remember as they secure a comprehensive 8️⃣-wicket victory 💜
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2025
Scorecard ▶ https://t.co/gPLIYGiUFV#TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/dADGcgITPW
आयपीएलमध्ये हा चमत्कार एकदाच घडला : या हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी पुनरागमन करणं सोपं असणार नाही. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकदाच असं घडलं आहे की एखाद्या संघानं पहिल्या 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभव पत्करुन प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे आणि विजेतेपदही जिंकलं आहे. हा चमत्कार 2015 मध्ये मुंबई इंडियन्स संघानं रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली केला होता. 2015 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघानं पहिल्या सहापैकी पाच सामने गमावले होते. यानंतर, संघानं पुनरागमन केलं आणि पुढील 8 पैकी 7 सामने जिंकले आणि प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केले. यानंतर, पात्रता आणि अंतिम सामन्यात सीएसके संघाला पराभूत करुन विजेतेपदही जिंकलं होतं.
🚨 CSK LOSE 3 CONSECUTIVE MATCHES AT THE CHEPAUK FOR THE FIRST TIME IN HISTORY. 🚨 pic.twitter.com/3qq48TOYOD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2025
केकेआरचा सहज विजय : सामन्याबद्दल बोलायचं झालं तर कोलकाता नाईट रायडर्स संघानं चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून आयपीएल 2025 च्या या हंगामात तिसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली कारण त्यांनी सीएसकेला 20 षटकांत 103 धावांवर रोखलं आणि नंतर फक्त 10.1 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठलं. केकेआरच्या विजयात सुनील नरीननं सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं गोलंदाजीत तीन विकेट्स घेतल्या आणि नंतर फलंदाजीत 44 धावांची शानदार खेळी केली. एमएस धोनीनं पुन्हा कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरही, सीएसके संघ या हंगामात खराब कामगिरी करत आहे.
🚨 HISTORY CREATED BY KKR. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2025
- CSK suffers their biggest ever defeat in IPL history (balls remaining). pic.twitter.com/NBkUgABFjf
हेही वाचा :