मुंबई BCCI Announce Squad : आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात बहुप्रतिक्षित इंग्लंड संघाविरुद्ध पाच सामन्यांची मोठी कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात कोणते खेळाडू असतील, भारतीय संघाचा नवा शिलेदार कोण असेल? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत, कारण बीसीसीआय इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करणार आहे.
THE MUCH AWAITED PRESS CONFERENCE TOMORROW AT 1.30 PM IST FOR ANNOUNCING INDIAN TEST TEAM. 🇮🇳 pic.twitter.com/L1wC3sDKth
— Johns. (@CricCrazyJohns) May 23, 2025
रोहित नंतर कर्णधार कोण : भारतीय कर्णधार रोहित शर्मानं आयपीएल दरम्यान अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्या पाठोपाठ विराट कोहलीनंही कसोटी क्रिकेटला रामराम केला. या दोघांनी घेतलेल्या अचानक निवृत्तीमुळं भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दोघांची जागा कोण भरणार असा प्रश्न त्यांच्या निवृत्तीनंतर चर्चित आहे. तसंच रोहित शर्माच्या जागी कर्णधार कोण होणार हा सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला. अनेक जाणकारांच्या मते भारतीय संघाचा नवा कर्णधार हा शुभमन गिल असेल तर काही जणांनी जसप्रीत बुमराच्या नावाला देखील पसंती दिली आहे. मात्र बीसीसीआय या दोघांपैकी कोणाची निवड करते की नव्या चेऱ्याला कर्णधार बनवून आश्चर्याचा धक्का देते हे आज कळणार आहे.
STAR SPORTS SPECIAL SHOW ON TEST TEAM TOMORROW AT 12.30 PM IST. 🇮🇳 pic.twitter.com/mUqP5FG4Hu
— Johns. (@CricCrazyJohns) May 23, 2025
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला कसोटी सामना - 20 ते 24 जून, लीड्स
- दुसरा कसोटी सामना - 02 ते 06 जुलै, बर्मिंघम
- तिसरा कसोटी सामना - 10 ते 14 जुलै, लंडन
- चौथा कसोटी सामना - 23 ते 27 जुलै, मॅंचेस्टर
- पाचवा कसोटी सामना - 31 जुलै ते 04 ऑगस्ट, लंडन
INDIAN SQUAD ANNOUNCEMENT LIVE ON STAR SPORTS TOMORROW. 🇮🇳 pic.twitter.com/PJYBWHFr82
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2025
कुठं पाहणार लाईव्ह : भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यासाठी बीसीसीआयनं एका विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. ही पत्रकार परिषद आज दुपारी दीड वाजेनंतर सुरु होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना ही पत्रकार परिषद स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ हॉटस्टार वर लाईव्ह पाहता येणार आहे.
हेही वाचा :