ETV Bharat / sports

6830 धावा आणि 127 विकेट घेणाऱ्या दिग्गज खेळाडूची IPL दरम्यान अचानक निवृत्ती - MOISES HENRIQUES

क्रिकेट जगतातील जवळजवळ सर्व स्टार खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. या दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळलेल्या एका स्टार क्रिकेट खेळाडूनं निवृत्तीची घोषणा केली आहे.

Moises Henriques
मोइसेस हेन्रिक्स (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : March 28, 2025 at 10:39 AM IST

2 Min Read

हैदराबाद Moises Henriques : क्रिकेट जगतातील जवळजवळ सर्व स्टार खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्याच वेळी, पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या क्रिकेट संघांमध्ये एक आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे. या दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळलेल्या एका स्टार क्रिकेट खेळाडूनं निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळाडूनं प्रथम श्रेणी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2024 पासून तो या फॉरमॅटचा भाग नाही. मात्र हा खेळाडू लिस्ट ए आणि टी-20 क्रिकेटमध्ये खेळत राहील.

दिग्गज खेळाडूनं अचानक केली निवृत्तीची घोषणा : वास्तविक 38 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मोइसेस हेन्रिक्सनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हेन्रिक्सनं ऑस्ट्रेलियासाठी चार कसोटी सामने खेळले आहेत, तो वनडे कपमध्ये न्यू साउथ वेल्ससाठी उपलब्ध असेल आणि सिडनी सिक्सर्ससोबतच्या त्याच्या सध्याच्या करारावर एक हंगाम शिल्लक आहे, ज्याचा तो कर्णधार देखील आहे. हेन्रिक्सने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून शेफील्ड शिल्डमध्ये न्यू साउथ वेल्सकडून कोणताही सामना खेळला नव्हता आणि आता त्यानं या फॉरमॅटलाच अलविदा म्हटलं आहे.

काय म्हणाला हेन्रिक्स : निवृत्तीची घोषणा करताना मोइसेस हेन्रिक्स म्हणाला, 'या वर्षी ख्रिसमसपूर्वी मी शेफील्ड शील्ड क्रिकेट खेळणं थांबवण्याचा निर्णय घेतला होता. इतके दिवस या राज्याचं नेतृत्व करणं हा एक सन्मान होता, पण न्यू साउथ वेल्ससाठी खेळणं म्हणजे केवळ शब्द आणि तयारीद्वारेच नव्हे तर कामगिरीद्वारे देखील नेतृत्व करणे होय. या वयातही, माझं शरीर अजून सक्षम आहे, परंतु मी सामने जिंकू शकलो नाही आणि खेळाच्या दीर्घ स्वरुपात माझ्या राज्याचं नेतृत्व करु शकलो नाही, जे मला वाटतं की तुम्ही या वयात करायला हवे.'

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कशी होती कामगिरी : 2013 मध्ये चेन्नई इथं भारताविरुद्धच्या कसोटी पदार्पणात त्यानं 68 आणि नाबाद 81 धावा केल्या, परंतु 2016 मध्ये भारताविरुद्ध दोन आणि श्रीलंकेविरुद्ध एक अशा पुढील तीन सामन्यांमध्ये तो दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्यानं त्याच्या कारकिर्दीत एकूण 131 लिस्ट-ए सामने खेळले, ज्यात त्यानं 34.84 च्या सरासरीनं 6830 धावा केल्या. यात त्याच्या बॅटमधून 13 शतकं झळकली. याशिवाय त्यानं 30.75 च्या सरासरीनं 127 विकेट्स घेतल्या आहेत.

हेन्रिक्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द : मोइसेस हेन्रिक्सनं आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 4 कसोटी, 16 वनडे आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. त्यानं 4 कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या आहेत आणि फलंदाजी करताना 164 धावाही केल्या आहेत. तर त्यानं 16 वनडे सामन्यांमध्ये 8 आणि टी-20 मध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं IPL मध्ये 62 सामन्यात 1000 धावा केल्या असून 42 विकेटही घेतल्या आहेत.

हेही वाचा :

  1. RCB 17 वर्षांचा दुष्काळ संपवत चेन्नईचा अभेद्य गड भेदणार? धोनी-कोहली आमनेसामने
  2. निकोलस पूरनच्या 26 चेंडूत 70 धावा... 300 धावा करण्याच्या गप्पा मारणाऱ्या हैदराबादचा घरातच दारुण पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.