कॅनबेरा Australia Squad for WTC Final : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ 11 ते 15 जून दरम्यान इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 चा अंतिम सामना खेळेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या जेतेपद सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. तर गेल्या 6 महिन्यांपासून बाहेर असलेला अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन संघातपरतला आहे. ऑस्ट्रेलियन संघानं WTC च्या तिसऱ्या आवृत्तीत शानदार कामगिरी केली आहे, ज्यात त्यांनी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
Introducing our squad for the 2025 ICC World Test Championship Final and the Qantas Men’s Test Tour of the West Indies 👊 pic.twitter.com/kZYXWKpQgL
— Cricket Australia (@CricketAus) May 13, 2025
सॅम कॉन्स्टास आणि जोश हेझलवूड संघात समावेश : क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात, पॅट कमिन्स कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. तर पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनचं पुनरागमन देखील निश्चित झालं आहे. त्याच वेळी, यावर्षी श्रीलंका दौऱ्यादरम्यान मालिकेच्या मध्यात देशात परतलेला तरुण सलामीवीर सॅम कॉन्स्टास यालाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय, ब्रेंडन डॉगेटला प्रवासी राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळालं आहे.
Two young stars have been included in Australia's squads for the World Test Championship and the West Indies Test tour. https://t.co/DRdyBZ8ty2
— cricket.com.au (@cricketcomau) May 13, 2025
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टॅस्टस, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह - ब्रेंडन डॉगेट.
AUSTRALIAN SQUAD FOR WTC FINAL:
— Johns. (@CricCrazyJohns) May 13, 2025
Cummins (C), Boland, Carey, Cameron Green, Hazlewood, Head, Josh Inglis, Khawaja, Sam Konstas, Matt Kuhnemann, Labuschagne, Nathan Lyon, Steve Smith, Mitchell Starc, Beau Webster. pic.twitter.com/7OvGga4Nmx
वेस्ट इंडिजविरुद्धही हाच संघ : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे, ज्यामध्ये तोच संघ सहभागी होईल. ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज दौरा 25 जूनपासून सुरु होईल ज्यात प्रथम तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर, दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामन्यांची मालिका देखील होईल.
हेही वाचा :