ETV Bharat / sports

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाची कांगारुंसमोर होणार 'लिटमस टेस्ट'; 'इथं' दिसेल लाईव्ह मॅच

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 07 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

AUS A vs IND A Live Streaming
भारत अ संघ (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 6, 2024, 7:30 PM IST

मेलबर्न AUS A vs IND A 2nd Test Live Streaming : ऑस्ट्रेलिया अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 07 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.

मालिकेत यजमान संघाची आघाडी : पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघानं भारत अ संघाचा 7 गडी राखून पराभव केला. अशा स्थितीत यजमान संघाच्या नजरा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर असतील. दुसरीकडे, भारत अ संघाला पुनरागमन करायचं आहे आणि दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया अ संघाला पराभूत करुन मालिका बरोबरीत आणण्याचं त्यांचं लक्ष असेल. याशिवाय सर्वांच्या नजरा केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांच्यावरही असतील जे दुसऱ्या अनधिकृत सामन्यासाठी संघात सामील होतील. राहुल न्यूझीलंडविरुद्ध फक्त एकच कसोटी सामना खेळला. तर जुरेल तिन्ही सामन्यांत खेळू शकला नव्हता.

केएल राहुलचा संघात समावेश : दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका संपताच केएल राहुल आणि यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल ऑस्ट्रेलियाला रवाना झाले होते. हे दोन्ही खेळाडू या चार दिवसीय सामन्यात भारत अ संघाकडून खेळतील. कारण हे दोन्ही खेळाडूं आगामी बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा भाग आहेत, त्यामुळं इशान किशनला भारत अ संघातून बाहेर बसावं लागू शकतं. किशननं भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ यांच्यातील दुसरा अनधिकृत कसोटी सामना कधी खेळला जाईल?

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना गुरुवार 7 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 5:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक त्याच्या अर्धातास आधी म्हणजे 04:30 वाजता होईल.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ दुसरा अनधिकृत कसोटी सामना कुठं पहायचा?

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याचं थेट प्रक्षेपण आणि भारतात लाईव्ह स्ट्रीमिंगबाबत माहिती अद्याप पुष्टी झालेली नाही. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईट आणि ॲपद्वारे हा सामना भारतात लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. सामना टीव्हीवर प्रसारित होणार नाही.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

भारत अ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन (यष्टिरक्षक), अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), मुकेश कुमार, खलील अहमद , यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल.

ऑस्ट्रेलिया अ : नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, स्कॉट बोलँड, जॉर्डन बकिंगहॅम, कूपर कोनोली, ऑली डेव्हिस, मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास, नॅथन मॅकअँड्र्यू, मायकेल नेसर, टॉड मर्फी, फर्गस ओ'नील, जिमी पीअरसन, जोश फिलिप, कोरी रोचिओली, मार्क स्टीकेटी, ब्यू वेबस्टर.

हेही वाचा :

  1. न्यूझीलंडविरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर रोहित-विराटला सर्वात मोठा धक्का
  2. आगामी मालिकेसाठी संघाची घोषणा; दिग्गज खेळाडूला बनवलं कर्णधार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.