ETV Bharat / sports

IPL मध्ये 'हा' भारतीय फलंदाज मारतो फक्त सिक्स; 32 चेंडूत शतकाचा विक्रमही नावावर - SRH VS LSG 7TH MATCH

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात सामन्यांमध्ये, एक फलंदाज असा दिसला आहे जो फक्त षटकार मारतो.

Aniket Verma
अनिकेत वर्मा (SRH X Account)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : March 28, 2025 at 2:40 PM IST

2 Min Read

हैदराबाद Aniket Verma : आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात सामन्यांमध्ये, एक फलंदाज असा दिसला आहे जो फक्त षटकार मारतो. आतापर्यंत या खेळाडूनं दोन सामने खेळले आहेत आणि एकही चौकार मारला नाही पण सहा षटकार मारले आहेत. या फलंदाजाचे नाव आहे, अनिकेत वर्मा. तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा फलंदाज आहे.

एकही चैकार मारला नाही : अनिकेत वर्माला या फ्रँचायझीनं लिलावात 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केलं. त्यानं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात आयपीएल पदार्पण केलं आणि एका षटकारासह नाबाद सात धावा केल्या. यानंतर गुरुवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्यानं 13 चेंडूत 36 धावा केल्या. अनिकेत वर्मा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानं पाच षटकार मारले. अशाप्रकारे, त्यानं पहिल्या दोन आयपीएल सामन्यांमध्ये, एकही चौकार मारला नाही. परंतु सहा षटकार मारले आहेत.

32 चेंडूत ठोकलं शतक : अनिकेतबद्दल बोलायचं झालं तर त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील झाशी इथं झाला पण तो स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. तो उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज देखील आहे. 2024 च्या मध्य प्रदेश टी-20 लीगमध्ये भोपाळ लिओपर्ड्सकडून खेळताना त्यानं 41 चेंडूत 123 धावा केल्या. यादरम्यान, त्यानं फक्त 32 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्याच्या खेळीत 13 षटकार आणि आठ चौकारांचा समावेश होता. मध्य प्रदेश प्रीमियर लीगच्या इतिहासातील हे पहिलंच शतक होतं. त्यानंतर त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी एमपी संघात समाविष्ट करण्यात आलं. त्यानं यात हैदराबादविरुद्ध सामना खेळला पण पहिल्याच चेंडूवर खातं न उघडता तो बाद झाला.

मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा : अनिकेत वर्मा हा मध्य प्रदेश प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यानं पाच सामन्यांमध्ये 61 च्या सरासरीनं आणि 205.4 च्या स्ट्राईक रेटनं 244 धावा केल्या. या सामन्यानंतर, भोपाळ लिओपर्ड्सनं त्याला पुढील हंगामासाठी संघात कायम ठेवलं आहे. तसंच अनिकेतनं पुरुषांच्या 23 वर्षांखालील राज्य अ करंडकात चांगली कामगिरी केली होती. त्यात मध्य प्रदेशकडून खेळताना, त्यानं कर्नाटकविरुद्ध नाबाद 101 धावा केल्या. या खेळीत आठ षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. आयपीएल 2025 च्या आधी, हैदराबादच्या सराव सामन्यात, त्यानं 16 चेंडूत 46 धावा केल्या. यामुळं त्याला ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन यांसारख्या स्फोटक फलंदाजांसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा :

  1. CSK ला मोठा धक्का... RCB विरुद्धच्या सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर
  2. 6830 धावा आणि 127 विकेट घेणाऱ्या दिग्गज खेळाडूची IPL दरम्यान अचानक निवृत्ती
  3. RCB 17 वर्षांचा दुष्काळ संपवत चेन्नईचा अभेद्य गड भेदणार? धोनी-कोहली आमनेसामने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.