ETV Bharat / sports

21 वर्षीय कोको गॉफनं पहिल्यांदा जिंकली French Open; जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव - COCO GAUFF

फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात, कोको गॉफनं तीन सेटच्या सामन्यात आर्यना सबालेंकाचा 2-1 असा पराभव करत फ्रेंच ओपनचं विजेतेपद जिंकण्यात यश मिळवलं.

French Open 2025
21 वर्षीय कोको गॉफनं पहिल्यांदा जिंकली French Open (Coco Gauff X Account)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : June 8, 2025 at 12:14 PM IST

1 Min Read

रोलँड गॅरोस French Open 2025 : फ्रेंच ओपन महिला एकेरीचा अंतिम सामना 7 जून रोजी येथील फिलिप चॅटियर कोर्टवर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेन्का आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोको गॉफ यांच्यात झाला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा झाली ज्यामध्ये कोको गॉफनं अखेर तीन सेट चाललेला सामना 2-1 असा जिंकला आणि तिच्या कारकिर्दीतील पहिलं फ्रेंच ओपन जेतेपद जिंकलं. हे कोको गॉफचं तिच्या टेनिस कारकिर्दीतील दुसरं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.

कोको गॉफनं पहिला सेट गमावला : 21 वर्षीय अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफनं तिच्या टेनिस कारकिर्दीत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ज्यात 2022 च्या सुरुवातीला ती जेतेपदाच्या सामन्यात पोहोचली होती तेव्हा तिला इगा स्वीटेककडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी कोको गॉफनं तिच्या भूतकाळातील चुकांमधून धडा घेतला आणि जेतेपद जिंकण्यात यश मिळवलं. तिचा आर्यना सबालेन्का विरुद्धचा सामना सुमारे 2 तास 38 मिनिटं चालला ज्यामध्ये कोको गॉफला पहिल्या सेटमध्ये पराभव पत्करावा लागला जो आर्यना सबालेन्का हिनं टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर 7-6 असा जिंकला.

सलग 2 सेटमध्ये वर्चस्व कायम ठेवत जिकलं विजेतेपद : पहिला सेट गमावल्यानंतर, कोको गॉफनं दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केलं आणि आर्यना सबालेंकावरील दबाव पूर्णपणे रोखला. कोको गॉफनं दुसरा सेट 6-2 असा जिंकून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्याच वेळी, आर्यना सबालेंकानं तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण कोको गॉफनं हा सेट 6-4 असा जिंकला आणि विजेतेपद पटकावलं. जेव्हा कोकोनं हे विजेतेपद जिंकलं तेव्हा ती आनंदानं जमिनीवर झोपली आणि हा विजय साजरा केला. कोको गॉफनं यापूर्वी 2023 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी यूएस ओपनचं विजेतेपद जिंकलं होतं.

हेही वाचा :

  1. RCB वर बंदी घालणार? बेंगळुरु घटनेनंतर BCCI मोठी अ‍ॅक्शन घेण्याच्या तयारीत
  2. 6,6,6,6,6... रत्नागिरीच्या फलंदाजाचं वादळ, 223.08 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करत केला कहर
  3. 41 तासांत दुसरी मॅच जिंकत यजमान संघ पाहुण्यांवर वर्चस्व कायम राखणार? निर्णायक सामना 'इथं' पाहा लाईव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.