मुंबई 1983 World Cup Winning Anniversary : भारतात क्रिकेट हा सर्वात जास्त खेळला जाणारा आणि पाहिला जाणारा खेळ आहे. जर भारतातील 10 पैकी 8 तरुणांना खेळात करिअर करायचं असेल तर त्यांची निवड क्रिकेट आहे. मात्र 1983 पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. 1983 हे वर्ष असं आलं की ज्यानं भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर स्थापितच केलं नाही तर देशातील प्रत्येक गावातील मुलांपर्यंत हा खेळ पोहोचवला.
25th June. 🇮🇳
— All Cricket Records (@Cric_records45) June 25, 2025
1932 – India played their first-ever Test match; it took place at Lord’s.
1983 – India won their first-ever ICC Trophy; it took place at Lord’s. pic.twitter.com/NrWnKGxw8p
51 वर्षांनंतर साकारता आला विश्वविजय : 25 जून 1932 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारतीय संघानं विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला हरवून बरोबर 51 वर्षांनंतर 1983 चा विश्वचषक जिंकला होता. 1983 च्या अंतिम सामन्यातील त्या विजयानं सध्या भारतीय क्रिकेटच्या मजबूत आणि प्रभावशाली स्थितीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. इकतंच नव्हे तर सचिन तेंडुलकरसारखे महान क्रिकेटपटूही या विजयाने प्रेरित होऊन क्रिकेटमध्ये आले. 1983 मध्ये जागतिक स्तरावर भारतीय संघाची गणना कमकुवत संघांमध्ये केली जात होती. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 'अंडरडॉग' म्हणून विश्वचषकात गेला होता. भारतीय संघ विजेता म्हणून उदयास येईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. भारतीय संघानही नाही. पण, ज्याच्याकडे कमीत कमी अपेक्षा असतात तोच इतिहास घडवतो.

1983 चा वनडे विश्वचषक 60 षटकांचा खेळला गेला. अंतिम सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने होते. वेस्ट इंडिजनं मागील दोन्ही विश्वचषक जिंकले होते, त्यामुळं भारतासाठी सामना सोपा नव्हता. 1983 पूर्वी 1975 आणि 1979 चा विश्वचषक खेळला गेला होता. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतानं फक्त एकच सामना जिंकला होता. वेस्ट इंडिज पहिल्या दोन विश्वचषकांचा विजेता होता आणि तिसऱ्या हंगामातही विजयाचा प्रबळ दावेदार होता. त्यानंतरही भारतानं सर्वांना आश्चर्यचकित करुन स्पर्धा जिंकली. या विश्वचषकानंतर भारतातील क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला.
HISTORIC DAY IN INDIAN CRICKET 🇮🇳
— All Cricket Records (@Cric_records45) June 25, 2025
India won their first-ever World Cup on this day in 1983 by beating the mighty West Indies at Lord's under the leadership of Kapil Dev, changing the dynamics of cricket in India. pic.twitter.com/j07SDIUMqF
विश्वविजेत्या वेस्ट इंडिजलाच हरवून झाली सुरुवात : भारतानं पहिल्याच साखळी सामन्यात वेस्ट इंडिजला हरवून खळबळ उडवून दिली. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियानं यशपाल शर्माच्या 89 धावांच्या खेळीच्या मदतीनं 262 धावा केल्या. त्यावेळी वनडे सामने 60 षटकांचे होते. रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री यांनी 3-3 विकेट घेतल्या आणि भारताला 34 धावांनी विजय मिळवून दिला.
झिम्बाब्वेवर 5 विकेटनं विजय : त्यानंतर भारतानं झिम्बाब्वेचा 5 विकेटनं पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 155 धावा केल्या. मदन लाल यांना तीन विकेट मिळाल्या. भारतानं 5 विकेट गमावून लक्ष्य गाठलं. संदीप पाटीलनं त्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.
On this day in 1983, India won the ODI World Cup under 24 year old captain Kapil Dev
— All Cricket Records (@Cric_records45) June 25, 2025
Youngest captains to win the ICC Trophy
• 24 years 170 days : Kapil Dev 🇮🇳
• 26 years 79 days : MS Dhoni 🇮🇳
• 27 years 197 days : Stephen Fleming 🇳🇿
• 28 years 94 days : Ricky Ponting 🇦🇺
•… pic.twitter.com/NKlS4clQiB
सलग दोन सामने गमावले : त्यानंतर भारतानं सलग दोन सामने गमावले. ऑस्ट्रेलियानं 162 धावांच्या मोठ्या फरकानं भारताचा पराभव केला. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध 66 धावांनी पराभव पत्करला. ट्रेवर चॅपेलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 110 आणि व्हिव्ह रिचर्ड्सनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 119 धावा केल्या होत्या.
कपिल देव यांच्या खेळीमुळं झिम्बाब्वेविरुद्ध विजय : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं 17 धावांत 5 विकेट गमावल्या. त्यानंतर कपिल देव यांनी 175 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. वनडे सामन्यात कोणत्याही भारतीय फलंदाजानं केलेलं ते पहिलंच शतक होतं. या शतकामुळं भारताचा आकडा 266 धावांवर पोहोचला. झिम्बाब्वेचा डाव 235 धावांपर्यंत मर्यादित राहिला.
🗓️ #OnThisDay in 1983
— BCCI (@BCCI) June 25, 2025
📍 Lord's
A historic day & a landmark moment for Indian cricket 🙌🏻#TeamIndia, led by the legendary @therealkapildev clinched the World Cup title 🏆🫡 pic.twitter.com/lATU8lrs2j
ऑस्ट्रेलियाकडून बदला घेतला : आपल्या शेवटच्या गट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा बदला घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 247 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची मजबूत फलंदाजी फळी फक्त 129 धावांवर आटोपली. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी त्या सामन्यात 29 धावांत 4 बळी घेतले होते.
उपांत्य फेरीत इंग्लंडवर विजय : उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतासमोर यजमान इंग्लंडचं आव्हान होतं. इंग्लंडचा डाव 213 धावांवर आटोपला. त्यांचा एकही फलंदाज 40 धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. कपिल देव यांनी 3 बळी घेतले तर रॉजर बिन्नी आणि मोहिंदर अमरनाथ यांनी 2-2 बळी घेतले. संदीप सिंगच्या 32 चेंडूत 51 धावांच्या वादळी खेळीमुळं भारताला विजय मिळाला. यशपाल शर्मा यांनी 61 धावा केल्या तर मोहिंदर अमरनाथ यांनी 46 धावा केल्या.
अंतिम फेरीत 183 धावांचा बचाव केला : अंतिम सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 183 धावा केल्या. श्रीकांतनं 38 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून सर अँडी रॉबर्ट्सनं 3 विकेट घेतल्या. माल्कम मार्शल आणि मायकेल होल्डिंग यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजीसमोर हे सोपं लक्ष्य वाटत होतं. व्हिव्ह रिचर्ड्सही वादळी पद्धतीनं फलंदाजी करत होते. पण 28 चेंडूत 33 धावा काढल्यानंतर तो बाद झाला आणि वेस्ट इंडिजचा डाव घसरला. कॅरेबियन संघ 140 धावांवर ऑलआउट झाला. भारतानं सामना 43 धावांनी जिंकला आणि विजेतेपद पटकावलं.
एकुणच भारतीय संघाच्या या करिष्माई आणि ऐतिहासिक विजयानं भारतातील क्रिकेट पूर्णपणे बदलून टाकलं. भारताचा हा विजय कधीही हार न मानण्याची आणि कोणत्याही परिस्थितीतून जिंकण्याची प्रेरणा म्हणून आजही चिन्हांकित आहे.
हेही वाचा :