मेष (Aries): हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ऋतू बदलामुळं आपणास सर्दी, खोकला इत्यादी समस्या त्रस्त करू शकतात. या आठवड्यात व्यापारी वर्ग अति आत्मविश्वासात राहून एखादी समस्या ओढवून घेण्याची शक्यता सुद्धा आहे. या आठवड्यात नोकरीत बदल करू शकतात. खर्चात वाढ झाल्यानं आपण त्रासून जाल. विद्यार्थ्यांची चिडचिड वाढल्यानं अभ्यासात लक्ष लागणार नाही. प्रेमीजनांनी आपला अहंकार बाजूस ठेवावा, अन्यथा त्यांच्यात दुरावा येऊ शकतो. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाचं वातावरण राहण्याची संभावना आहे.
वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्याची सुरूवात मित्रांच्या सहवासात राहून आपण करू शकाल. व्यापाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जास्त श्रम करावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा कार्यक्षेत्री मेहनत वाढवावी लागू शकते. या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपणास नशिबाची साथ मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र अजून वाट पाहावी लागेल. आपल्याला जर एखादी व्यक्ती आवडली असेल तर तिला आपण मनातील भावना सांगू शकाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात.
मिथुन (Gemini) : या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहील. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. खर्चात कपात होऊन प्राप्तीत वाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते आपल्या व्यवसाय विस्ताराचा विचार करू शकतात. विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाप्रती एखादा भ्रम असू शकतो.
कर्क (Cancer) : या आठवड्यात आपणास नेत्र विकार होण्याची संभावना आहे. त्याकडं दुर्लक्ष न करता एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. ऋतू बदलामुळं सर्दी, खोकला इत्यादींचा त्रास सुद्धा होऊ शकतो. या आठवड्यात प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. आपल्या घरी विशेष काही करण्याचा प्रयत्न ह्या आठवड्यात आपण करू शकाल. असं केल्यानं आपला वैवाहिक जोडीदार आपल्यावर खुश होईल. व्यापाऱ्यांना जर त्यांच्या व्यवसायात काही बदल करावयाचा असेल तर त्यांनी तो या आठवड्यात करू नये. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपल्या कामगिरीच्या प्रशंसेसह पगारवाढ होण्याची संभावना सुद्धा आहे. आपल्या आर्थिक स्थितीत काही बदल होत असल्याचं आपणास जाणवेल. विद्यार्थ्यांनी मन लावून अध्ययन केल्यास त्यांना चांगलं यश मिळू शकतं.
सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. बाहेरील पदार्थ खाल्ल्यानं आपले पोट बिघडू शकते. प्रेमीजनांच्या जीवनात काही कारणाने दुरावा येऊ शकतो. दांपत्य जीवनात सुद्धा वाद होत असल्याचं दिसून येईल. आपणास आपल्या संबंधांचे महत्व समजू शकणार नाही. आपणास जर शेअर्स बाजारात गुंतवणूक करावयाची असेल तर तज्ञ व्यक्तीशी सल्ला मसलत केल्या शिवाय ती करू नये. विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. उच्च शिक्श घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. आपणास जर एखादा व्यवसाय करावयाचा असेल तर त्यासाठी या आठवड्यात आपण कर्ज घेऊ शकता. व्यापारासाठी मेहनत करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा ह्या आठवड्यात यश प्राप्त होऊ शकते. आपणास जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे.
कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपणास रक्तवाहिन्यांशी संबंधित त्रास होण्याची संभावना असून आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात कुटुंबियांच्या सहवासात आपण सुखद क्षण घालवू शकाल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवू शकाल. व्यापारात एखादा चांगला सौदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा संघर्षग्रस्त आहे. असं असलं तरी त्यांना प्रगतीची संधी मिळू शकते. आपल्या प्राप्तीत वाढ होऊ शकते. त्याचबरोबर खर्चात सुद्धा जास्त वाढ संभवते.
तूळ (Libra) : आपणास जर रक्ताशी संबंधित एखादा जुना आजार असेल तर या आठवड्यात आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापाराच्या बाबतीत आत्मविश्वास राहील. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रेमीजनांत काही कारणाने भांडण झाल्यानं त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तणाव असल्याचं आपणास जाणवेल. त्यामुळं आपल्यात वाद होऊ शकतात. आर्थिक स्थिती डळमळीत असेल. एखादे आर्थिक नुकसान सुद्धा संभवते. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते.
वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. सर्दी, खोकला, ताप इत्यादी आरोग्य विषयक त्रास होण्याची संभावना आहे. व्यवसायाशी संबंधित आपले एखादे सरकारी काम स्थगित झाले असल्यास ते या आठवड्यात वेळेवर पूर्ण होऊ शकते. नोकरीत बदल संभवत असल्यानं आपण वाणीवर संयम ठेवावा. आपण प्रेमिकेसह काही सुखद क्षण घालवू शकाल. या आठवड्यात जलद गतीनं आपली प्राप्ती वाढू शकते. या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येण्याची शक्यता आहे. आपण एखाद्या भ्रमात राहण्याची संभावना असून त्यामुळं आपण त्रस्त होऊ शकता.
धनु (Sagittarius) : या आठवड्यात तंदुरुस्त राहण्यासाठी आपण नियमितपणे योगासन आणि व्यायाम करावा. व्यापाऱ्यांना व्यवसायवृद्धीसाठी आर्थिक मदत मिळू शकेल. प्रेमीजनांच्या जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं कटुता येण्याची संभावना आहे. विवाहितांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. घराच्या नूतनीकरणासाठी आपण खूपच जास्त पैसा खर्च करण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात अचानकपणे विद्यार्थ्यांचे मन अभ्यासाकडं वळेल आणि त्यामुळं अध्ययनात काही त्रास सुद्धा होऊ शकतो.
मकर (Capricorn) : या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. आपण ध्यान-धारणा करावी, अन्यथा आरोग्य विषयक तक्रारी वाढू शकतात. प्रेमीजनांनी त्यांच्या प्रेमिकेशी संबंध दृढ करावेत, अन्यथा प्रेमिकेचे मन इतरत्र भटकू शकते. आपण तिच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. व्यापारी जर त्यांच्या व्यापारासाठी काही आर्थिक गुंतवणूक करू इच्छित असतील तर ते तसे करू शकतील. ह्या आठवड्यात वाद-विवादात आपला जास्त पैसा खर्च होण्याची संभावना आहे. ह्या व्यतिरिक्त घरगुती गरजा भागविण्यासाठी सुद्धा जास्त पैसा खर्च करू शकता. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अनेक अडचणी येऊ शकतात. आपण बाहेर फिरण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवाल. त्यामुळं परीक्षेत आपणास अपेक्षित यश मिळू शकणार नाही.
कुंभ (Aquarius) : या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहणार असली तरी आपल्या आहारावर आपणास नियंत्रण ठेवावं लागेल. अन्यथा आपली प्रकृती बिघडू सुद्धा शकते. आपणास जर नव्याने एखादा व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर आपण त्यात यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांच्या कामगिरीची प्रशंसा कार्यक्षेत्री होऊ शकते. प्रेमीजनांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा सावध राहावे. विवाहितांनी त्यांच्या शंका दूर कराव्या, अन्यथा कुटुंबात खूप मोठा वाद होऊ शकतो. ऐश आरामी जीवन जगण्यासाठी आपण खूप खर्च करण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यावयाची आहे त्यांना जास्त मेहनत करावी लागेल.
मीन (Pisces) : या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरील पदार्थ खाण्याकडं आपण आकर्षित होण्याची शक्यता असून त्याने आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात अपेक्षित यश प्राप्त होऊ शकते. विवाहितांसाठी आठवडा अनुकूल आहे. हिंडण्या-फिरण्यात आपला बराचसा पैसा खर्च होऊ शकतो. आपण शेअर्स बाजारात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. या आठवड्यात विद्यार्थी त्यांच्या अध्ययनाकडं जास्त लक्ष देऊ शकतील. त्यांना त्यांच्या मेहनतीचं अपेक्षित परिणाम सुद्धा मिळू शकतात. आपली कारकीर्द घडविण्यासाठी आपणास जास्त श्रम करावं लागू शकतात.