मुंबई : वट सावित्री पौर्णिमा (Vat Purnima) हा विवाहित हिंदू स्त्रियांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी स्त्रिया वडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात. तर आम्ही तुम्हाला दैनिक पंचांगमध्ये शुभ काळ, राहूकाळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, तिथी, करण, नक्षत्र इत्यादींबद्दल माहिती देत आहोत. तर जाणून घेऊयात ज्योतिषी शिव मल्होत्रा यांच्याकडून आजचं पंचांग.
- आजची तारीख : 10-06-2025 मंगळवार
- आजची तिथी : शुक्ल चतुर्दशी
- आजचे नक्षत्र : अनुराधा
- अमृतकाळ : 12:35 to 14:14
- राहूकाळ : 15:54 to 17:33
- सुर्योदय : 05:57:00 सकाळी
- सुर्यास्त : 07:13: 00 सायंकाळी
वटपौर्णिमा शुभ तारीख काय? : यंदा वट पौर्णिमा (Vat Savitri Purnima 2025) १० जूनला साजरी केली जाणार आहे. सकाळी 11:30 वाजता वटपौर्णिमेच्या पूजाला सुरुवात होईल. दूसऱ्या दिवशी 11 जूनला दुपारी 1:13 मिनिटांनी तिथी संपणार आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 11:55 वाजल्यापासून दुपारी 12:51 वाजेपर्यंत ब्रम्ह मुहूर्त आहे. यावेळेत पूजा करावी.
काय आहे वटवृक्षाचं महत्त्व? : वटवृक्ष हे शुभ मानलं जातं कारण त्यात देवताचे निवास मानले जाते. त्यामुळं वडाला सात फेऱ्या मारल्यानं पतीला दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते, असा समज आहे.
सात फेऱ्यांचं काय महत्त्व ? : सात फेऱ्या मारणं हे सात जन्मांमधील एकनिष्ठतेचे प्रतीक मानलं जातं. या फेऱ्या मारताना, महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सात जन्मासाठी एकच पती मिळावा यासाठी प्रार्थना करतात.
आजची पंचांग तिथी : हिंदू कॅलेंडरनुसार, 'चंद्ररेषा' 'सूर्य रेषे' पेक्षा 12 अंश वर जाण्यासाठी जो वेळ लागतो त्याला 'तिथी' म्हणतात. एका महिन्यात तीस तिथी असतात आणि या तिथी दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला 'अमावस्या' म्हणतात.
हेही वाचा -
साताजन्मासाठी नवविवाहीत महिलांनी 'अशी' करावी वटपौर्णिमा साजरी, जाणून घ्या व्रताची कथा