मेष (ARIES) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशम स्थानी असेल. आज घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आपणाला आनंदाची भावना राहील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान, प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. आग, पाणी व दुर्घटनापासून सावध राहा. कामाच्या व्यापामुळं थकवा जाणवेल.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून चांगल्या बातम्या येतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढले.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टम स्थानी असेल. आज नकारात्मक विचारांपासून दूर राहणं हिताच राहील. शक्यतो नवीन कार्य आज सुरू करू नये. रागावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. खर्च जास्त झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.
कर्क (CANCER) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील.
सिंह (LEO) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना बोलण्यावर संयम ठेवा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येईल. आईविषयी चिंता राहील.
कन्या (VIRGO) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज शक्यतो वादापासून दूर राहणं हिताच राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्यानं मन आनंदित होईल. पोटाच्या तक्रारी वाढू शकतील. शेअर्स, सट्टे बाजारात गुंतवणूक करताना सावध राहावे.
तूळ (LIBRA) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. आईची चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्यापासून दूर राहणं हिताच राहील. झोप पूर्ण न झाल्यानं मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन - जुमल्याच्या बाबतीत सावध राहावं लागेल.
वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांशी घराविषयी महत्वाची चर्चा कराल. आर्थिक लाभ संभवतात. नशिबाची साथ लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. मित्रांच्या सहवासामुळं मन आनंदित होईल. कामात यश मिळेल.
धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळं त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेणं हिताचं ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. दूरस्थ मित्र वा नातलग यांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्याकडून येणार्या बातम्या किंवा निरोप आपणांस लाभदायक ठरतील.
मकर (CAPRICORN) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान-सन्मान होतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. भेटवस्तू मिळाल्यानं आपण आनंददित व्हाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. एखादा अपघात संभवतो. प्रकृती उत्तम राहील.
कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शक्यतो कोर्ट - कचेरी पासून दूर राहा. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. एखादा अपघात संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. पैसा खर्च होईल.
मीन (PISCES) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आज आपण कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -