मेष (ARIES) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टम स्थानी आहे. आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. स्त्री आणि पाण्यापासून जपून राहावे लागेल.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. आज संसारात आणि दांपत्य जीवनात सुख-शांती अनुभवाल. कुटुंबीय आणि निकटचे मित्र यांच्यासह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील. धनलाभ होईल. दूर राहणार्या स्नेह्यांकडून येणारी बातमी आपणास खुश करील. भागीदारीत लाभ आणि सार्वजनिक जीवनात मान-सन्मान मिळेल.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांततेचं आणि आनंदाचं वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो कारणी लागेल. आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. कामात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचं प्रमाण मात्र वाढेल. विनाकारण संताप व्यक्त केल्यास आपले काम बिघडण्याची शक्यता आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
कर्क (CANCER) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आजच्या दिवसाची सुरूवात चिंताने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. अचानक धन खर्च होईल. वाद - विवाद होऊन मतभेद होईल. एखादी मानहानी संभवते. प्रवासात अडचणी येतील.
सिंह (LEO) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आपल्या वक्तव्याने गैरसमज वाढतील आमि आपले मन उदास होईल. आईशी मतभेद होतील आणि तीच्या प्रकृतीची काळजी वाटत राहील. सरकारी आमि मालमत्तेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी.
कन्या (VIRGO) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरऱ्या स्थानी आहे. आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. मित्र आणि स्वकीयांशी सुसंवाद साधू शकाल. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ सुद्धा होतील. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल.
तूळ (LIBRA) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्याने आपण कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. अशा परिस्थितीत नवीन कामाची सुरवात न करणं हिताच राहील. संबंधितांशी मतभेद संभवतात. व्यवहारात हट्टीपणा सोडावा लागेल. प्रवासात अडचणी येतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबियांशी वाद संभवतात. शक्यतो आज कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आनंददायी बातमी समजेल. प्रवास सुखद होतील.
धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. आजचा दिवस कष्टदायक आहे. प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. त्यामुळं मानसिकदृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा. एखादी दुर्घटना संभवते. कोर्ट-कचेरीतील प्रकरणांपासून सावध राहा. अधिक खर्च झाल्यानं पैशाची चणचण भासेल.
मकर (CAPRICORN) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात आहे. मित्राचा सहवास घडल्यानं आजचा दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. विवाहेच्छुकांना जोडीदाराची निवड सहजपणे करता येईल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. घरात एखादे मांगलिक कार्य होईल.
कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र श्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळं बढती मिळण्याची शक्यता आहे. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. धनप्राप्ती होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल.
मीन (PISCES) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात आहे. आज आपण मानसिक अस्वास्थ्यामुळं त्रस्त व्हाल. शरीरास थकवा आणि आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीची काळजी राहील. शक्यतो महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. व्यापारात अडचणी येतील. मनात नकारात्मक विचार येतील.
हेही वाचा -