मेष (ARIES) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणा यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रम करून सुद्धा कमी यश प्राप्त झाल्यानं नैराश्य येईल. संततीविषयक काळजी निर्माण होईल. पोटाच्या तक्रारीमुळं हैराण व्हाल. प्रवासात अडथळे येतील. सरकारी कामात मात्र यश मिळेल.
वृषभ (TAURUS) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपण प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास आणि खंबीर मनोबलासह करून त्यात यश मिळवाल. वडिलांकडून आणि वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करू शकतील. कला आणि क्रीडा क्षेत्रांत कलाकारांना आपलं कसब दाखविण्याची संधी मिळेल. संततीविषयक कामावर खर्च होईल.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावं लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळं विचार सतत बदलतील. तन-मनाला स्फूर्ती लाभेल. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. विरोधकांनवर मात करू करू शकाल. नशीबाची साथ लाभेल.
कर्क (CANCER) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचं समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. सर्व प्रकारच्या अवैध बाबींपासून दूर राहणं हिताच राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल.
सिंह (LEO) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील आणि वडीलधार्यांचं सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान होतील. उतावीळपणा सोडावा लागेल. काही कारणानं आपला संताप वाढेल. पोटदुखीचा त्रास संभवत असल्यानं खाण्या-पिण्याकडं लक्ष द्यावं लागेल. पूर्ण दिवस आनंदात जाईल.
कन्या (VIRGO) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. दिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आज कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावं लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. शांत चित्ताने काम करा. संतापामुळं कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी जाणवेल. तब्बेतीकडं लक्ष द्यावं लागेल. नोकरीत हाताखाली काम करणार्यांपासून सावध राहा.
तूळ (LIBRA) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल. घरात पत्नी आणि संततीकडून काही सुखद बातमी मिळेल. धनप्राप्ती संभवते. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. एखाद्या स्त्रीमुळं फायदा होईल. मनासारखे वैवाहिक सौख्य उपभोगू शकाल.
वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि उल्हास राहील. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. तब्बेत उत्तम राहील. धनलाभ संभवतो. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. मित्र व संबंधितांकडून लाभ होतील. संततीची समाधान कारक प्रगती होईल.
धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती सुद्धा नरम गरम राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संततीविषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. नशीबाची साथ मिळणार नाही. जोखमीच्या कामापासून शक्यतो दूर राहा. कार्य पूर्ण होणं कठीण आहे. वरिष्ठांशी संघर्ष होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात.
मकर (CAPRICORN) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज नोकरी-व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यालयीन कामे कौशल्य पूर्वक कराल. व्यावहारिक आणि सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. खाणं- पिणं, हिंडणं- फिरणं याकडं लक्ष राहील. अचानकपणे खर्च उदभवतील. भागीदारीत मतभेद संभवतात. गुडघेदुखीचा त्रास संभवतो. संताप आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणं हिताच राहील. नवीन काम सुरू करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही.
कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज आपणात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळं दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. स्वादिष्ट भोजन आणि नवी वस्त्रे यामुळं मन प्रसन्न राहील. विवाहितांना वैवाहिक सुख चांगले मिळेल. सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल.
मीन (PISCES) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगलं राहील. घरात शांतता व आनंदाचं वातावरण असेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वभाव उतावळा बनेल. बोलण्यात मर्यादा आणि वर्तनात नम्रता ठेवावी. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल.
हेही वाचा -