ETV Bharat / spiritual

'मेष ते मीन' सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 08 APRIL 2025

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 8, 2025 at 1:55 AM IST

3 Min Read

मेष (ARIES): कर्क राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भावात असेल. आज कुटुंबियांशी मतभेद झाल्यानं मन उदास होईल. छातीतील दुखणं किंवा इतर आजारामुळं चिंतेत राहल. आर्थिक खर्चात वाढ होईल. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. शक्यतो बौद्धिक चर्चा टाळाव्यात.

वृषभ (TAURUS) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या भावात असेल. आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान संभवतात. दुपारनंतर मात्र संघर्षमय वातावरणास सामोरे जावं लागेल. नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानहानी संभवते.

मिथुन (GEMINI) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भावात असेल. आज मनातील नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचं मन लागणार नाही. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न राहील. तरीही नवीन कार्याचा आरंभ करण्याचं धाडस करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वकीयांच्या सहवासामुळं मन आनंदीत होईल. प्रवास आनंददायी होतील.

कर्क (CANCER) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भावात असेल. आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील आणि मन ताजेतवाने राहील. दुपारनंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल. अवैध प्रवृत्तीमुळं मन भ्रष्ट होऊ नये याकडं लक्ष द्यावं लागेल. पैसा जास्त खर्च होईल.

सिंह (LEO): कर्क राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भावात असेल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. गैरसमज आणि मतभेद होण्याची शक्यता असल्यानं वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. दुपारनंतर मात्र मित्र- स्नेही यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.

कन्या (VIRGO) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. दुपारनंतर मात्र एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. संतापाच्या भरात कोणाशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती नरम गरम होईल. प्राप्तीच्या मानाने खर्चात वाढ होईल.

तूळ (LIBRA) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या दशम भावात असेल. आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळं मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्च अधिकार्यांमुळं व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आर्थिक नियोजन निष्ठापूर्वक कराल. तब्बेत उत्तम राहील. मानसिक शांतता लाभेल. संततीकडून सुख मिळेल.

वृश्चिक (SCORPIO) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते. आपले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होतील. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील.

धनू (SAGITTARIUS) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या अष्टम भावात असेल. आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल. आर्थिक चणचण भासेल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल. अचानक धन प्राप्ती संभवते. व्यवसायात लाभ होईल. मित्र आणि स्नेही यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. प्रवास संभवतात.

मकर (CAPRICORN) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भावात असेल. आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. अवैध कार्यापासून दूर राहावे.

कुंभ (AQUARIUS) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भावात असेल. आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. वाहनसौख्य मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात कीर्ती होईल. वस्त्र आणि अलंकार यासाठी पैसा खर्च होईल. एखादा प्रवास घडेल.

मीन (PISCES) : कर्क राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या भावात असेल. आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणं हितावह होईल. आज वाद होण्याची शक्यता असल्यानं शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील. दुपारनंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभल्यानं समाधान होईल. व्यावसायिकांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

हेही वाचा -

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक शुभ योग! या राशींना होणार विशेष लाभ, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.