- मेष (ARIES) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडं होईल. द्विधा मनामुळं ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका. शारीरिक, मानसिक बेचैनी राहील. मंगल कार्यावर पैसा खर्च होईल. विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील.
- वृषभ (TAURUS) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी आणि मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान-सन्मान मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील.
- मिथुन (GEMINI) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज शारीरिक, मानसिक सौख्य मिळेल. नोकरी-व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असं वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळं आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचं राहील. पित्याकडून लाभ होईल. सरकारी काम पूर्ण होण्यात अडचणी येणार नाहीत. दांपत्य जीवनात सुख, आनंद मिळेल.
- कर्क (CANCER) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज शारीरिक, मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळं आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे.
- सिंह (LEO) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडं लक्ष द्यावं लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्यानं आपलं मन अशांत होईल. संततीविषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.
- कन्या (VIRGO) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. पती-पत्नीतील दुरावा संपून जवळीक निर्माण होईल.
- तूळ (LIBRA) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. घरातील सुखा-समाधानाचं वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. माता-पिताकडून काही चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
- वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्यविषयक चिंता निर्माण होईल. संततीविषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चा किंवा वादविवाद ह्यात सहभागी न होणे हितावह राहील. शेअर - सट्टा यांचे आकर्षण हानी करेल.
- धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज जास्त संवेदनशीलतेमुळं कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थितीमुळं मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्यादृष्टीनं पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेतीविषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. निद्रानाशाचा त्रास होईल. पाण्यापासून जपून राहणे हिताचे ठरेल.
- मकर (CAPRICORN) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावं लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. शेअर-सट्ट्यातील गुंतवणूक लाभ देईल. मित्र, स्वकीय व भावंडे यांच्याशी चांगले मेतकूट जमेल. मनाची तगमग दूर होईल. विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त होईल.
- कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळं कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्यानं कुटुंबियांशी मतभेद होतील. मंगल कार्यावर खर्च होईल. प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नकारात्मक विचार दूर करा.
- मीन (PISCES) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित व मित्र यांच्याशी भेट-संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. प्रवासाची शक्यता आहे. तन-मनानं प्रसन्न राहाल.
हेही वाचा -