मेष (ARIES) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात असेल. आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. स्त्री आणि पाण्यापासून जपून राहावं लागेल.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा असेल. आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रांकडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्यांना व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत यश व प्रतिष्ठा मिळेल.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा असेल. आजचा दिवस कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीनं अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातील रागावर आवर घालण्याची मात्र आवश्यकता आहे.
कर्क (CANCER) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा असेल. आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळं बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडं आकर्षित झाल्यानं एखाद्या संकटात सापडाल. आज यात्रा, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हितावह होऊ शकणार नाही. पोटाच्या आणि पचनाच्या तक्रारी त्रास देतील.
सिंह (LEO) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या असेल. आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचं वातावरण राहील. आई-वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. पाण्यापासून जपा. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका.
कन्या (VIRGO) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा असेल. आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. समाजात मान-सन्मान मिळेल. चित्तवृत्ती प्रफुल्लित राहील.
तूळ (LIBRA) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा असेल. आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम असेल. आज आपण तन-मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. मंगल कार्या निमित्त बाहेर जावे लागेल. आनंददायक बातम्या मिळतील.
धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा असेल. आजचा दिवस कष्टदायक आहे. प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्यानं मन दुःखी होईल. त्यामुळं मानसिकदृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा. एखादी दुर्घटना संभवते. कोर्ट-कचेरीतील प्रकरणांपासून सावध राहा. अधिक खर्च झाल्यानं पैशाची चणचण भासेल.
मकर (CAPRICORN) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असेल. आजचा दिवस नोकरी-व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी आणि संतती यांच्याकडून लाभ होईल. विवाहोत्सुक युवक-युवतींचे विवाह ठरतील. प्रवास व सहल होईल.
कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात असेल. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्यानं आपण खुश व्हाल. नोकरी-व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारी व वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल. संसारात आनंद वाटेल. धनप्राप्ती तसेच बढती संभवते.
मीन (PISCES) : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असेल. आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आरोग्याची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीच्या समस्या सतावतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकणार नाही. आज शक्यतो कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका.
हेही वाचा -