ETV Bharat / spiritual

शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी शुभ की अशुभ?, वाचा राशीभविष्य - Horoscope 20 September 2024

Horoscope 20 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 3:33 AM IST

Horoscope  2024
राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)

मेष (ARIES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं सावध राहावं लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक देवाण-घेवाणीत लक्ष द्यावं लागेल. एखादी दुर्घटना संभवते. दुपारनंतर मात्र, खूप खुशीत राहाल. घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. कटुंबात एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस नवीन काम हाती घेण्यास अनुकूल आहे. अचानक धनलाभ संभवतो.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने शुभ फलदायी आहे. मित्र आणि वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. नवे मित्र होतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळं मनाला आनंद मिळेल. प्रवास संभवतात. दुपारनंतर शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. धार्मिक कार्यांवर खर्च होईल. स्वभाव उदासीन होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावं लागेल. आध्यात्मिक बाबींमध्ये सक्रीय होऊन त्यात आनंद मिळवू शकाल.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्यानं आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. दुपारनंतर मित्रांकडून लाभ होईल. एखाद्या सामाजिक कार्यास हजेरी लावाल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कर्क (CANCER) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळं उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक, मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपारनंतर मात्र, व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामामुळं संतुष्ट राहतील. आर्थिकदृष्टया लाभ होईल.

सिंह (LEO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज वाद होण्याची शक्यता असल्यानं संताप आणि वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील. शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. वरिष्ठ व प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वादविवाद करू नका. नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

कन्या (VIRGO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान-सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. करमणुकीमुळं दिवस आनंदात जाईल. व्यापारी येणी वसूल होतील. दुपारनंतर प्रकृती नरम गरम होईल. अचानक लाभ संभवतात.

तूळ (LIBRA) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कोणतेही कार्य खंबीर मनाने व आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी व शांत राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. कार्यनैपुण्य आणि कलेची जाण प्रदर्शीत करण्याची संधी मिळेल. मनोरंजक वातावरणात आपण आनंदात असाल व आप्तेष्टांना त्यात सहभागी करून घ्याल. प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस साहित्यिकांना अनुकूल आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. तरीही प्रत्येक कार्य शांतपणे करावे लागेल. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आईच्या तब्बेतीत बिघाड व घरातील गढूळ वातावरणामुळं आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थीक नुकसान आणि मानहानी संभवते. दुपारनंतर मात्र, मन विधायक कार्याकडे वळेल. प्रेमभावना वाढीस लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस शुभ आहे.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील. मित्रांसह एखाद्या सहलीचं आयोजन कराल. भावंडे व नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. दुपारनंतर एखाद्या दुर्घटनेमुळं मनःस्वास्थ्य बिघडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. व्यावसायिकांना व्यावसायिक चिंता भेडसावतील. घर किंवा स्थावर मालमत्ते संबंधीच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक स्वाक्षरी करावी.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर आणि जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळं कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपारनंतर विचारात स्थैर्य येईल. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडं आपला कल राहील. घरातील वातावरण सुख- समाधानाचं राहील. कार्यात यश मिळवू शकाल.

मीन (PISCES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवास संभवतात. दुपारनंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. पैशाच्या देवाण- घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

हेही वाचा -

पितृपक्षात 'या' वेळेत करा श्राद्ध विधी; पितृदोषापासून मिळेल मुक्ती - Pitru Paksha 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.