ETV Bharat / spiritual

अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ तीन राशींना होणार धनलाभ; वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 30 APRIL 2025

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 30, 2025 at 12:10 AM IST

4 Min Read

हैदराबाद : अक्षय्य तृतीयेचा दिवस हिंदू धर्मात अतिशय शुभ मानला जातो. हा दिवस भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांना समर्पित आहे. या दिवशी अनेक राजयोगांचे एक अद्भुत संयोजन तयार होत आहे. या योगायोगांमुळं काही राशींच्या लोकांच्या संपत्तीत देखील वाढ होऊ शकते, तर चला जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

मेष (ARIES): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल आणि त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. नकारात्मक विचारापासून दूर राहावे.

वृषभ (TAURUS): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस उत्साह आणि प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्यानं सुख आणि आनंद अनुभवाल. सगे-सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास आणि स्वादिष्ट भोजनामुळं आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आर्थिक फायदा संभवतो. आज वैवाहिक जीवनातील सौख्य प्राप्त होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला देवी लक्ष्मीचे अपार आशीर्वाद मिळणार आहेत, ज्यामुळं या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठं यश मिळू शकतं. तुमच्या कामाचं कौतुक होईल.

मिथुन (GEMINI): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बाराव्या भावात असेल. आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळं तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र आणि कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपलं बोलणं किंवा व्यवहार यामुळं कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा अपघात संभवतो. आज आपला खर्च अधिक होईल. मानसिक चिंतेने मन त्रस्त होईल. वायफळ कामावर शक्ती खर्च होईल.अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. त्याच वेळी, नोकरी करणाऱ्यांसाठी लाभाचे मार्ग खुले होतील. तसेच, बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो.

कर्क (CANCER): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जोडीदार आणि संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीशी सुसंवाद साधू शकाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. चिंता दूर होतील. मित्रांसह एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

सिंह (LEO): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. खंबीर मनामुळं प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. संपत्तीपासून लाभ होईल. कला आणि क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपलं कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीनं सरकारी कामे सफल होतील. घराचा कागदोपत्री व्यवहार करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.

कन्या (VIRGO): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ (LIBRA): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणं हिताच राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल.

वृश्चिक(SCORPIO): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज दैनंदिन कामाकडं दुर्लक्ष करून आनंद-प्रमादात आपण व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान-सन्मान होतील. मित्र व कुटुंबियांशी हिंडणं - फिरणं आनंददायी ठरेल.

धनू (SAGITTARIUS): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण राहील. नोकरीत लाभ आणि सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. आईच्या घराण्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास घडेल.

मकर (CAPRICORN) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपलं मन द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्यानं आज कोणतेही महत्वाचं काम न करणं हितावह राहील. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. वडिलधार्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च होतील. संततीशी मतभेद संभवतात.

कुंभ (AQUARIUS): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज मानसिक तणावामुळं ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने यावर पैसा खर्च होईल. आईकडून लाभाची शक्यता आहे. जमीन, घर आणि वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल. कोणत्याही गोष्टीत हट्टीपणा करू नका.

मीन (PISCES): चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक आणि सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्यानं सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दिवस आनंदात जाईल. मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडांकडून लाभ होईल. कार्यात यश मिळेल. मान-सम्मान होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी नोकरीत तुम्हाला लाभ मिळू शकते. नवीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच, नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते.

हेही वाचा -

  1. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ना पैसा, ना दागिने फक्त 'या' पाच गोष्टींचं करा दान, घरात होईल भरभराट
  2. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच का करतात सोने खरेदी?, जाणून घ्या सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.