ETV Bharat / politics

'लाडक्या बहिणी'साठी अजित पवारांची मोठी घोषणा; यंदाच्या रक्षाबंधनला भेटणार मोठी ओवाळणी - Mazi Ladki Bahin Yojana

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 10:13 PM IST

Mukhyamantri Majhi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील महिला अर्ज भरत आहेत. या योजनेची राज्यात प्रचंड चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या योजनेचे पैसे आता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत आज मोठी घोषणा केलीय.

Mazi Ladki Bahin Yojana
रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम (Etv Bharat File Photo)

बारामती Mukhyamantri Majhi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो महिलांना दर महिन्याला आता 1500 रुपये मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. अजित पवार यांनी रविवारी बारामतीत जन सन्मान रॅलीच्या जाहीर सभेत राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? याबाबत मोठी घोषणा केलीय.

रक्षाबंधनला तीन हजार रुपये होणार जमा : चांद्यापासून बांद्यापर्यत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत. तीन सिलेंडर मोफत देणार आहे. माझी महिला सक्षम व्हावी, आत्मनिर्भर व्हावी, यासाठी ही योजना महायुतीनं आणली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचं आहे. निवडून नाही दिलं तर ही योजना मला नीट राबवता येणार नाही, असं सांगतानाच आता हौसे-नौसे-गौसे आमची योजना कशी चुकीची आहे हे सांगायला येतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.

महिलांकरीता 'लाडकी बहिण योजना' आणली त्यावेळी माझ्यावर टिका झाली. मात्र, मी त्यांना फार महत्व दिलं नाही. माझ्या पाठीशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व लोकांचे सहकार्य आहे याची खात्री होती. त्यामुळं ही योजना चांगल्या पध्दतीनं राबवू शकतो हा विश्वास मला आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री

जनतेचा विकास आणि गरीब लोकांना मदत : जन सन्मान रॅलीच्या जाहीर सभेत अजित पवार म्हणाले की, वरुणराजाने वर्षाव करुन आपल्याला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज 'जन सन्मान' रॅलीच्या माध्यमातून उभा आहे. जनतेचा विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूनं आम्ही प्रयत्न करत आहोत. हाच विचार आम्ही विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्व जनतेला सांगणार आहेत.

एक लाख कोटी रुपये सर्व समाजघटकांना दिले जाणार आहेत. ही सर्व जबाबदारी अजितदादांच्या खांद्यावर आम्ही टाकली असून, ती जबाबदारी ते शंभर टक्के पार पाडतील यात शंका नाही. - छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस

मी शब्दाचा पक्का : लोकसभेत आपल्याला अपयश आले परंतु त्याने खचून जायचं नाही. विधानपरिषद निवडणुकीत यश आले म्हणून हुरळून जायचं नाही. यश पण पचवायला शिकले पाहिजे आणि नव्या उमेदीने लोकांसमोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. तीच तयारी माझ्या सहकार्‍यांनी ठेवली. विधानपरिषद निवडणुकीत शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना दिलेला शब्द मी खरा करुन दाखवला, मी शब्दाचा पक्का आहे. जो वादा असतो तो पक्का असतो, हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ज्यावेळी मला अर्थखाते मिळाले त्यावेळी मी जनतेचा विकास करताना गरीबी दूर करायची आहे असा निर्णय घेतला होता. त्यापध्दतीने पावले उचलली असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधक हताश होऊन चुनावी जुमला बोलत आहेत. मात्र, १५ ऑगस्टला जेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील, त्यावेळी विरोधक हे किती हताशपणे टिका करत आहेत हे जनतेसमोर येणार आहे. त्यामुळं अजितदादा तुम्ही घेतलेल्या निर्णयासोबत महाराष्ट्रातील जनता पाठीशी उभी राहिल. - सुनिल तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती : या 'जन सन्मान' जाहीर सभेला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार सुनेत्राताई पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आदींसह पक्षाचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. चार बायका असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार का - मनसे - Mazi Ladki Bahin Yojana
  2. महिलांमध्ये गोंधळाची परिस्थिती; राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची वस्तुस्थिती काय? - Mukhyamantri Ladki Bahin Yojana
  3. बहिणीला दिला ४ महिने त्रास, आता आणली लाडकी बहीण योजना : जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाना - Ladaki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.