ETV Bharat / politics

नाशिक जिल्ह्यात काही पारंपरिक लढती तर काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढत; जाणून घ्या राजकीय समीकरण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारसभेला जोरदार सुरुवात झालीय. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढत होणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024
नाशिक विधानसभा मतदारसंघ (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 10:55 PM IST

नाशिक : नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर राजकीय समीकरण बदलले आहेत. यंदा नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात काही ठिकाणी पारंपरिक तर काही मतदारसंघात दुरंगी, तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.

भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सलग 20 वर्षांपासून येवला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. यंदा ते पाचव्यांदा विकासाच्या मुद्यावर उमेदवारी रिंगणात उतरले आहेत. त्यांची सरळ लढत राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार माणिकराव शिंदे यांच्याशी आहे. भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीमध्ये झालेले बंड शमले असून उद्धवसेनेचे कुणाल दराडे यांनी माघार घेतल्यामुळं छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे अशी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत आहे. या मतदारसंघात 3 लाख 23 हजार 799 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कळवण मतदारसंघ दुरंगी लढत : कळवण मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नितीन पवार निवडून आले होते. यंदा पुन्हा नितीन पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्यावतीनं मकपाकडून माजी आमदार जीवा पांडू गावित आणि महाराष्ट्र स्वराज पार्टीकडून रमेश थोरात निवडणूक रिंगणात असणार आहेत. या मतदारसंघात 3 लाख 779 मतदार आहेत.

बागलाणमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत : बागलान मतदारसंघात 2019 मध्ये भाजपाचे दिलीप बोरसे निवडून आले होते. यंदा पुन्हा भाजपाच्या वतीनं दिलीप बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीनं शरद पवार गटाकडून दीपिका चव्हाण तर प्रहार पक्षाच्यावतीनं राजश्री गरुड हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या मतदारसंघात दोन लाख 97 हजार 760 मतदार आहेत.

सिन्नर मतदारसंघात दुरंगी लढत : सिन्नर मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे निवडून आले होते. यंदा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून कोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार पक्षाकडून उदय सांगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात असले तरी कोकाटे विरुद्ध सांगळे
अशी थेट लढत होणार आहे. या मतदारसंघात 3 लाख 20 हजार 409 मतदार आहेत.

दिंडोरी मतदार संघात दुरंगी लढत : दिंडोरी मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ निवडून आले होते. यंदा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून झिरवाळ यांना उमेदवारी देण्यात आली तर शरद पवार पक्षाकडून सुनीता चारोस्कर यांना रिंगणात उतरविण्यात आलं आहे. मात्र शरद पवार पक्षाचे संतोष रेहेरे यांनी बंडखोरी केल्यानं महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. या मतदारसंघात 3 लाख 28 हजार 386 उमेदवार आहेत.

निफाडमध्ये दुरंगी लढत : निफाड मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप बनकर निवडून आले होते. यंदा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात थेट पारंपारिक लढत होणार आहे. या मतदारसंघात 2 लाख 97 हजार 154 मतदार आहेत.

चांदवड मतदारसंघात तिरंगी लढत : चांदवड मतदारसंघात 2019 मध्ये भाजपाचे डॉ. राहुल आहेर हे निवडून आले होते. मात्र यंदा भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, तर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीनं गणेश निंबाळकर निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात 3 लाख 7 हजार 363 मतदार आहेत.

मालेगाव मध्य मतदारसंघ चौरंगी लढत : मालेगाव मध्य मतदारसंघात 2019 मध्ये एमआयएम पक्षाकडून मुक्ती मोहम्मद इस्माईल हे निवडून आले होते. यंदा पुन्हा एमआयएम पक्षाकडून मुक्ती इस्माईल यांना उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेस पक्षाकडून एजाज बेग, समाजवादी पक्षाकडून शान ए हिंद आणि इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली पार्टीच्यावतीनं असिफ शेख यांना उमेदवारी देण्यात आल्यानं या ठिकाणी चौरंगी लढतीची शक्यता आहे. या मतदारसंघात 3 लाख 40 हजार 670 उमेदवार आहेत.

मालेगाव बाह्य मतदारसंघात तिरंगी लढत : मालेगाव बाह्य मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेचे दादा भुसे निवडून आले होते. यंदा पुन्हा शिवसेना शिंदे पक्षाकडून भुसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्यावतीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अद्वय हिरे आणि अपक्ष उमेदवार बंडू काका बच्छाव हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. येथे 3 लाख 77 हजार 308 मतदार आहेत.

देवळाली मतदारसंघात तिरंगी लढत : देवळाली मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सरोज अहिरे निवडून आल्या होत्या. यंदा पुन्हा अहिरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे योगेश घोलप आणि शिंदे सेनेच्यावतीनं एबी फॉर्म माघारीचे पत्र देऊनही उमेदवारी करत असलेल्या राजश्री अहिरराव निवडणूक रिंगणात कायम आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात 2 लाख 84 हजार 299 मतदार आहेत.

नांदगाव मतदारसंघात चौरंगी लढत : नांदगाव मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेना पक्षाकडून सुहास कांदे निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंकज भुजबळ यांच्या पराभव केला होता. यंदा पुन्हा शिवसेना शिंदे गटाकडून सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आली. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश धात्रक उमेदवारी करत आहेत. तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. या सोबतच अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसे हे ही निवडणूक रिंगणात राहणार असल्यानं या मतदारसंघात चौरंगी लढत बघायला मिळणार आहे. या मतदारसंघात 3 लाख 40 हजार 1 मतदार आहेत.

इगतपुरी मतदारसंघात चौरंगी लढत : इगतपुरी मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून हिरामण खोसकर निवडून आले होते. यंदा खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पावर पक्षाकडून रिंगणात आहे. काँग्रेस पक्षाकडून लकी जाधव आणि मनसेकडून काशिनाथ मेंगाळ आणि उद्धव ठाकरेंच्या बंडखोर उमेदवार माजी आमदार निर्मला गावित या रिंगणात असल्यानं या मतदारसंघात चौरंगी लढत बघायला मिळणार आहे. येथे 2 लाख 78 हजार 911 मतदार आहेत.

नाशिक मध्य मतदारसंघात दुरंगी लढत : नाशिक मध्य मतदारसंघात 2019 मध्ये भाजपाच्या देवयानी फरांदे या निवडून आल्या होत्या. यंदा पुन्हा भाजपाकडून फरांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वसंत गीते निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाचे रंजन ठाकरे आणि मनसेचे अंकुश पवार यांनी माघार घेतल्यानं या मतदारसंघात आता फरांदे विरुद्ध गीते अशी सरळ लढत होणार आहे. या मतदारसंघात 3 लाख 41 हजार 208 मतदार आहेत.

नाशिक पश्चिम मतदारसंघात तिरंगी लढत : नाशिक पश्चिम मतदारसंघातून 2019 मध्ये भाजपाच्या सीमा हिरे या निवडून आल्या होत्या. यंदा पुन्हा हिरे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेकडून दिनकर पाटील हे रिंगणात असून या मतदारसंघात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. या मतदारसंघात 4 लाख 73 हजार 821 मतदार आहेत.

नाशिक पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत : नाशिक पूर्व मतदारसंघातून 2019 मध्ये भाजपाचे राहुल ढिकले हे विजय झाले होते. यंदा पुन्हा भाजपाकडून ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली. तर शरद पवार पक्षाकडून गणेश गीते निवडणूक रिंगणात आहेत. मनसेकडून प्रसाद सानप हे निवडणूक लढवत असून या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात 4 लाख 1 हजार 718 मतदार आहेत.

हेही वाचा -

  1. लोकसभेपेक्षा विधानसभेत चित्र वेगळं असेल, भाजपा नेते डॉ. भागवत कराड यांना विश्वास
  2. "देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ..." उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला
  3. निवडणूक आयोगाची सोशल मीडियावरील प्रचारावर करडी नजर, निवडणूक प्रचारासाठी चहा-कॉफीचा दर निश्चित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.