पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले. एकत्र असलेलं पवार कुटुंब दिवाळीला देखील वेगवेगळा पाडवा साजरा करताना पाहायला मिळालं. मात्र, आता पवार कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालं.
साखरपुड्यात ३०४ लोकांना आमंत्रित : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांचा गुरुवारी पुण्यातील घोटावडे फाटा येथील फार्म हाऊस येथे साखरपुडा पार पडला. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न पार पडणार आहे. गुरुवारी झालेल्या साखरपुड्यात ३०४ लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यात पवार कुटुंब तसेच इतर मान्यवरांचा सहभाग होता. यावेळी अजित पवार यांची पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी नव्या सुनेला हळद- कुंकू लावत भेटवस्तू देत तिचं पवार कुटुंबात स्वागत केलं.
So happy for our Jay, and a warm welcome to Rutuja! Congratulations to both of you!" 🎉💞
— Supriya Sule (@supriya_sule) April 10, 2025
stay happy and blessed. 💕❤️💕 pic.twitter.com/C44n1SpmCh
पवार कुटुंब एकत्र : जय पवार यांच्या साखरपुड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार तसेच सर्वच पवार कुटुंबीय उपस्थित होतं. अजित पवार यांनी बंड पुकारत महायुती सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा देखील करण्यात आला होता. त्यानुसार निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना देण्याचा निर्णय दिला. पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही वेगळे होत लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात यूगेंद्र पवार यांना उभं केलं होतं. मात्र, आता जय पवार यांच्या साखरपुड्याला सर्वच पवार कुटुंब हे एकत्र आलेलं पाहायला मिळालं. साखरपुड्याच्या आधी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी आजोबा शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेत आशीर्वाद देखील घेतले.
कोण आहे ऋतुजा पाटील? : पवार कुटुंबीयांची सुनबाई ऋतुजा पाटील ही साताऱ्यातील फलटणचे सहकार महर्षी हनुमंतराव पाटील यांची नात असून, प्रवीण पाटील यांची कन्या आहे. ऋतुजा पाटील ही उच्चशिक्षित आहे. वडील प्रवीण पाटील यांची सोशल मीडियाची कंपनी आहे. ऋतुजा पाटील ही फलटण येथील श्रीराम बाजार या किराणाशी संबंधित मॉलची संचालक आहे.
हेही वाचा -
- नऊ तालुक्यांचा मतदारसंघ अन् 23 लाख मतदार; 5 कोटींचा फंड कसा पुरणार? अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर
- राज्यात सत्तेत एकत्र, पण साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमनेसामने, अजित पवार भाजपाला कसे रोखणार?
- "मी जेवढं काम केलं, तेवढं करणारा आमदार मिळणार नाही', उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीत दावा