ETV Bharat / politics

'उद्योगपती मस्क म्हणजे तिकडले अदानी’ संजय राऊतांचा घणाघात - SANJAY RAUT

संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प विरोधी आंदोलन आणि वक्फ दुरुस्ती कायद्यापासून शेअर बाजार कोसळण्यापर्यंत विविध मुद्यांवर भाष्य केलं.

Sanjay Raut
संजय राऊत (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 7, 2025 at 3:01 PM IST

2 Min Read

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प सरकारने लादलेल्या टॅरिफचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी उघडताच कोसळले. या आठवड्याचा पहिलाच दिवस शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी घेऊन आला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये तब्बल तीन हजारांची घसरण पाहायला मिळाली. या काळात गुंतवणूकदारांना 20.16 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळं आशियाई शेअर बाजारात घबराटीचं वातावरण आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, एलन मस्क म्हणजे अमेरिकेतील अदानी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.

ट्रम्प आणि मस्क म्हणजे तिकडले अडाणी : यावर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "अमेरिकेची जनता आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. अमेरिकेच्या जनतेचं त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जसं दिसलं तसं आता अमेरिकेत दिसत आहे. अमेरिकेच्या 50 राज्याची जनता ही ट्रम्प आणि उद्योगपती मस्क म्हणजे तिकडले अडाणी यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचा स्फोट होण्याची शक्यता आहे. हा देश मोदी आणि अमित शाह यांना विकला जात आहे. वक्फ बोर्ड ही त्याची एक महत्त्वाची पायरी आहे."

प्रतिक्रिया देताना संजय राऊत (ETV Bharat REporter)

आपल्या देशात चार उद्योगपती : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "या देशात सुद्धा गावागावांमध्ये लोक रस्त्यावर उतरून क्रांतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. उद्योगपती एलन मस्क तुमचा लाडका असल्यामुळं तोच हस्तक्षेप करू शकतो. आपल्या देशात चार उद्योगपती आहेत. ते देश चालवत आहेत. हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्या सोयीनं धोरणं बदलली जात आहेत. कामगार कायदे बदलले जात आहेत. हे त्यांच्यासाठी आहे. उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकावलं तरी आश्चर्य वाटणार नाही. या देशातसुद्धा तेच घडणार आहे. म्हणून मी वारंवार बोलत आहे नरेंद्र मोदी 2025 चा काळ पूर्ण करतील का मला शंका वाटते. मोदी परदेशात फिरत आहेत. त्यांना देशामध्ये काय कोसळले आहे काय पडले आहे याची माहिती देखील नसेल. ते वीस हजार कोटीच्या आलिशान विमानातून फिरत आहेत. परदेशात जाऊन परदेशी पंतप्रधानांना मिठ्या मारत आहेत." अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा -

  1. "मोदींची भेट घेण्यासाठी जर आम्हाला केसरकरांची गरज पडत असेल तर..."; संजय राऊतांचा हल्लाबोल, वक्फ बोर्डावरुनही डिवचलं
  2. 'माझ्या नादाला लागाल, तर महाराष्ट्र सोडून जावं लागेल'; संजय राऊतांचा प्रफुल पटेलांना टोला, म्हणाले 'तुम्हाला दाऊदचा हिरवा रंग. . '
  3. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून वक्फ सुधारणा विधेयकाचा वापर-संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.