ETV Bharat / politics

"...म्हणून अमित शाहांकडून राष्ट्रपती राजवटीचे कारस्थान"; संजय राऊतांचा गंभीर आरोप - SANJAY RAUT NEWS

"निवडणूक आयोगाला हाताशी धरुन मोदी-शाह यांनी राज्यात पुढील सहा महिने राष्ट्रपती राजवट व्हावी, यासाठी षड्यंत्र रचले," असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut news
अमित शाह (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 20, 2024 at 1:24 PM IST

Updated : October 20, 2024 at 2:56 PM IST

2 Min Read

मुंबई - "राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. भाजपाला पराभवाची भीती आहे. त्यामुळेच निवडणूक निकाल आणि त्यानंतर सरकार स्थापनेसाठी खूप कमी कालावधी आहे,"असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते रविवारी माध्यमांशी बोलत होते.

मर्द असाल तर- खासदार संजय राऊत म्हणाले, "राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. भाजपा पराभवाच्या छायेत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाशी हाताशी धरुन मतदार यादीत घोटाळा सुरू आहे. मतदार यादीतील नावं गायब होत आहेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. किमान 150 मतदारसंघात प्रत्येकी 10 हजार नावं काढायची आणि त्याठिकाणी बोगस नाव टाकायची हे सुरू आहे. लोकशाहीतील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. पण, आम्ही विधानसभेत यांचा नक्कीच पराभव करणार आहोत. आम्ही लोकांपर्यंत पोहचू जागृत करणार आहोत. निवडणूक आयोगाच्या हे निदर्शनास आणून देऊ."

चंद्रशेखर बावनकुळे घोटाळ्याचे सूत्रधार- खासदार राऊत म्हणाले, " बोगस मतदारांच्या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत. यांनी याबाबत नागपूरला विशेष अधिवेशन घेतलं आहे. मतदारांची नावं कशी काढायची? बोगस आपली नावे कशी टाकायची? याचं प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिलं आहे." मर्द असाल तर लोकशाही पद्धतीने निवडणुकीला सामोरी जा" असं आव्हानं संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना दिलं. " मतदार यादीतील घोटाळा हा हरियाणा आणि झारखंड येथे केला. आता महाराष्ट्रात करु पाहत आहेत. पण हे आम्ही होऊ देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू," असा इशारा राऊतांनी भाजप नेत्यांना दिला. अमित शाह हे घाणेरडं राजकारण करीत आहेत. अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असंही शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणालेत.

अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू- "विधानसभा निवडणुक 20 नोव्हेंबरला असून निकाल 23 तारखेला लागणार आहे. 26 नोव्हेंबरला नवीन सरकार स्थापन करायचे आहे. आमचे मविआचा सरकार नक्की येणार आहे. राज्यात सत्तांतर होणार आहे. त्यामुळे फक्त दोन दिवसात मंत्रिमंडळ स्थापन करण्यास वेळ मिळणार नाही. नवीन सरकार सस्थापन करण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. यावेळेत सरकार स्थापन झाले नाही तर पुढील सहा महिने निवडणूक आयोगाला हाताशी धरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची. हे अमित शाहांचे षडयंत्र आहे," असा गंभीर आरोप यावेळी राऊतांनी केला.

महाविकास आघाडी टिकली पाहिजे- " आज दुपारी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक होणार आहे. यात जागावाटप यावर चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप या आठवड्यात होईल, असं राऊत म्हणाले. महाविकास आघाडी टिकली पाहिजे असं मला वाटतं. जागावाटपावर मविआत एकमत झालं आहे. काही जागांचा नक्की होणे बाकी आहे. पण, लवकरात लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल," असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा

  1. महाविकास आघाडीत बिघाडी! पटोले बैठकीत असल्यास आम्ही बैठकीत सहभागी होणार नाही, ठाकरे गटाची भूमिका
  2. पुलवामा हल्ला हा देखील एक वोट जिहाद; संजय राऊतांचा हल्लाबोल, जागा वाटपावरुन काँग्रेसलाही फटकारलं

Last Updated : October 20, 2024 at 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.