ETV Bharat / politics

"काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला", योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महायुतीचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर टीका केलीय.

YOGI ADITYANATH
योगी आदित्यनाथ (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2024, 5:38 PM IST

Updated : Nov 6, 2024, 8:07 PM IST

वाशिम : विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय हालचालींना वेग आलाय. अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. अशातच महायुतीचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विदर्भ दौऱ्यावर असून आज ते वाशिम येथे भाजपाचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

मोदींच्या नेतृत्वात थेट सजिर्कल स्ट्राईक : योगी आदित्यनाथ यांनी भाषणाची सुरुवात 'भारत माता की जय'च्या घोषणेनं केली. त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार उल्लेख झाला. सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, "1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसच्या काळात देशात अतिरेकी हल्ले होत होते. तेव्हा पाकिस्तान घुसखोरी करत बॉम्बस्फोट करत होते. चीन सिमा ओलांडून देशात घुसखोरी करायचे. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यामुळं परिस्थिती बदललीय. मोदींच्या नेतृत्वात आता थेट सजिर्कल स्ट्राईक होतं. मोदींमुळं आता चीन देखील देशात घुसखोरी करत नाहीत."

काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान : "काँग्रेसनं भारताचा कधीच विचार केला नाही. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. तसंच त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा कट रचला होता," असा घणाघात योगी आदित्यनाथ यांनी केला.

एनडीए सरकारला मत द्या : "हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केला. त्यांच्या नावानं असलेल्या शहराची गरज काय? त्या शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. ही अभिमानास्पद बाब आहे, असं ते म्हणाले. "मोदींच्या नेतृत्वात नवा भारत निर्माण करण्यात येत आहे. भारत कोणापुढे झुकणारा नाही आणि मागे हटणारा नाही. त्यामुळं एनडीए सरकारला मत द्या," असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी जनतेला केलं.

हेही वाचा

  1. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घोषणापत्र प्रसिद्ध, 'लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार;' अजित पवारांचं आश्वासन
  2. "20 तारखेला बकरीला कापू," सुनील राऊतांचं वादग्रस्त विधान; आक्षेपार्ह विधानांमुळे विरोधक वारंवार अडचणीत, नेमकी कारणं काय?
  3. "दादांच्या घड्याळाचे बारा वाजलेत"- सुरेश धस यांचा अजित पवारांवर निशाणा

Last Updated : Nov 6, 2024, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.