नागपूर Devendra Fadnavis : अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध सुरुच आहे. देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक नवा खुलासा केला आहे. "आम्हाला कारागृहात टाकण्यासाठी एकदा नाही तर तब्बल चार वेळा षडयंत्र रचण्यात आले होते. मात्र, काही चांगल्या अधिकाऱ्यांनी षड्यंत्रात भाग घेण्यास नकार दिल्यानं आम्ही महाविकास आघाडीचे पितळ उघडे पाडू शकलो," असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते आज नागपूर येथे बोलत होते.
जेलमध्ये टाकण्याची दिली होती सुपारी : "परमबीर सिंग जे काही बोलले आहेत ते अगदी खरं आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. माझ्यासोबत प्रविण दरेकर, गिरीश महाजन आणि अन्य काही नेते यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती. काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला. हा प्रयत्न एकदा नाही तर चार वेळा प्रयत्न झाले. पण यांना काही मिळालं नाही. या संदर्भात व्हिडिओ पुरावे सीबीआयला दिलेत. आजंही आमच्याकडे अनेक व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते फक्त माझ्यावरच बोलतात : "अलीकडच्या काळात तर माझ्यावर अनेकांचे प्रेम वाढले आहे. त्या लोकांना हे लक्षात येऊ लागले आहे की महायुतीला हरवायचे असेल तर एकाच व्यक्तीला टार्गेट करा. म्हणून तुम्ही बघा सकाळचा भोंगा चालू झाला की माझ्यावर सुरू होतो. ठाकरे गटातील तीन लोकं, शरद पवार गटाचे तीन लोकं आणि काँग्रेसचे तीन लोकं हे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त माझ्यावरच बोलतात," असं म्हणत फडणवीसांनी संजय राऊतांवर टीका केली.
परमबीर सिंग हेच मास्तरमाईंड - अनिल देशमुख : "उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवणं आणि त्यासाठी ज्याचं वाहन वापरलं त्या मनसुख हिरेन यांची हत्या, या दोन्ही प्रकरणात मास्टरमाईंड हे परमबीर सिंग होते," असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. या दोघांमध्ये एक डील झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याचं आदेशानं परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले असल्याचं अनिल देशमुख म्हणाले. राज्यात दोन वर्षांपासून महायुतीचं सरकार आहे. मग, चांदिवाल आयोगाचा अहवाल कां प्रलंबित ठेवला, याचे देवेंद्र फडणविसांनी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा -